नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवाग याने सनरायजर्सवर टीका देखील केली होती. सनरायजर्सच्या फलंदाजांना मोठी खेळी करणे जमत नसल्याचे सेहवागने एका वेबसाईटला सांगितले होते.
त्याने मुंबई आणि सनरायजर्सच्या सामन्याच्या आधी हौदराबादच्या फलंदाजीवर टीका केली होती. सेहवागने म्हटले होते की, सनरायजर्सच्या फलंदाजांना फटकेबाजी करता येत नाही. त्यांना या सामन्यात फार तर १५० चा पल्ला गाठता येईल. मुंबई इंडियन्स असते तर त्यांनी आपल्या धडाकेबाज खेळीने २०० ते २५० चा टप्पा गाठला असता.’
मात्र दुबईच्या मैदानावर सनरायजर्सच्या फलंदाजांनी तुफानी खेळी संघाला २०० चा टप्पा गाठून दिला. या प्रकारानंतर इतरांची नेहमीच खिल्ली उडवणा-या विरेंद्र सेहवागची नेटीझन्सनी चांगलीच खिल्ली उडवायला सुरूवात केली. एका चाहत्याने तर त्याला थेट सुनावले ‘पाजी आप वॉकआऊट कर सकते हो’ तर अनेकांनी सनरायजर्सच्या फलंदाजांनी केलेल्या विक्रमाची त्याला जाणीव करून दिली. या सामन्यात सनरायजर्सचा कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना विक्रम केला. त्यांनी एकत्रित १००० पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. तसेच वॉर्नरने अर्धशतक झळकतांना पंजाबविरोधातील सलग नवव्या सामन्यात अर्धशतक झळकावले. बेअरस्टो याने ९७ धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे एसआरएचने किंग्ज इलेव्हन पंजाबवर शानदार विजय मिळवला.
Web Title: IPL 2020: So Sehwag became a troll after Hyderabad match, fans advise him to walk out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.