Join us  

IPL 2020 : चेन्नईचे काही खेळाडू सरकारी नोकरी असल्याप्रमाणे खेळतात; सेहवागने काढला चिमटा

IPL 2020 : पंजाबने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य चेन्नईने एकही बळी न गमावता पार केले. यानंतरच्या सामन्यात मात्र चेन्नईने पुन्हा कच खाल्ली. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले १६८ धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा सीएसकेची गाडी घसरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 4:26 PM

Open in App

मुंबई - चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai Superkings) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये विजयी सुरुवात केल्यानंतर सलग तीन सामने गमावले. मात्र यानंतर त्यांनी किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) १० गड्यांनी बाजी मारताना जबरदस्त पुनरागमन केले. पंजाबने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य चेन्नईने एकही बळी न गमावता पार केले. यानंतरच्या सामन्यात मात्र चेन्नईने पुन्हा कच खाल्ली. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले १६८ धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा सीएसकेची गाडी घसरली. संघातील अनेक फलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरी चेन्नईच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. यावर अता माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही (Virendra Sehwagh) टीका केली असून ‘सीएसकेचे काही खेळाडू आयपीएलमध्ये सरकारी नोकरी असल्याप्रमाणे खेळतात,’ असे मत व्यक्त केले आहे.केकेआरने दिलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसनच्या अर्धशतकामुळे १०-१२ षटकांपर्यंत चेन्नईची विजयी मार्गावरुन वाटचाल सुरु होती. मात्र यानंतर अचानकपणे चेन्नईला ठराविक अंतराने धक्के बसले आणि केकेआरने गमावलेला सामना खेचून आणला. चेन्नईला केवळ १५७ धावाच काढता आल्या. गेल्या पाच सामन्यांत चेन्नईचा हा चौथा पराभव ठरला.चेन्नईच्या या कामगिरीवर टीका करताना सेहवागने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, ‘चेन्नईकडून हे लक्ष्य पार झाले पाहिजे होते. केदार जाधव आणि रविंद्र जडेजाने जे डॉट बॉल खेळले, ते चेन्नईला महागात पडले. माझ्या मते चेन्नईचे काही फलंदाज सरकारी नोकरी असल्याप्रमाणे खेळतात. तुम्ही प्रदर्शन करा अथवा नका करु, त्यांना माहित आहे की, काहीही झाले तरी आपल्याला आपले मानधन मिळणार आहे.’ 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सविरेंद्र सेहवाग