Join us  

ipl 2020 SRH vs CSK: ...तर आज वॉर्नर करेल पराक्रम; नोंदवेल कोणत्याही परदेशी खेळाडूला न जमलेला विक्रम

ipl 2020 SRH vs CSK david warner: केवळ १९ धावांनी दूर आहे वॉर्नरचा शानदार विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 2:55 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020)चे पहिले सत्र संपले असून आजपासून सनरायझर्स हैदराबाद (Sunrise Hydrabad) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkins) या सामन्याने दुसºया सत्राला सुरुवात होईल. सध्याची कामगिरी पाहता या सामन्यात हैदराबादचे पारडे काहीसे वरचढ आहे. हैदराबादने ७ पैकी ३ सामने जिंकून ४ सामने गमावले आहेत आणि त्यांनी गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे सीएसकेची यंदाची कामगिरी निराशाजनक असून त्यांनी ७ पैकी केवळ २ सामने जिंकताना ५ पराभव पत्करले आहेत. त्यात हैदराबादचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नरही (David Warner) फॉर्ममध्ये आला असल्याने सीएसकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सामन्यात वॉर्नरला आयपीएलमध्ये मोठा विक्रम रचण्यासाठी केवळ १९ धावांची गरज असून जर तो यशस्वी ठरला, तर वॉर्नर विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांच्या पंक्तीत स्थान मिळवेल.त्याचवेळी, या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते डेव्हिड वॉर्नरकडे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये वॉर्नरचा समावेश असून सर्वाधिक धावा फटकावणाºया फलंदाजांमध्ये त्याने चौथे स्थान पटकावले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ ३ फलंदाजांना ५ हजार धावांचा पल्ला पार करता आलेला आहे. विशेष म्हणजे हा टप्पा आता वॉर्नरच्या आवाक्यात आला असून यापासून तो केवळ १९ धावांनी दूर आहे.वॉर्नरने आज चेन्नईविरुद्ध १९ धावा केल्यास तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करेल. सध्या वॉर्नरने १३३ सामने खेळतना ४,९८१ धावा केल्या आहेत. याआधी केवळ विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांनीच ५ हजार धावा केल्या आहेत. त्यामुळेच वॉर्नरला या तिघांची बरोबरी करण्याची संधी आहेच, शिवाय तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करणारा पहिला विदेशा खेळाडूही ठरेल.

टॅग्स :IPL 2020डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्सविराट कोहलीसुरेश रैनारोहित शर्मा