रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ( Royal Challengers Bangalore) सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. एबी डिव्हिलियर्सच्या ( AB de Villiers) फटकेबाजीनंतर वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी टिच्चून मारा करताना KKRच्या फलंदाजांना जखडून ठेवले. RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह Point Tableमध्ये तिसरे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यानंतर युजवेंद्र चहलचे ( Yuzvendra Chahal) कौतुक करताना युवराज सिंगनं ( Yuvraj Singh) पुन्हा मैदानावर उतरावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली. त्याला चहलनं भन्नाट उत्तर दिलं.
देवदत्त पडीक्कल ( ३२) आणि आरोन फिंच ( ४७) यांच्या दमदार सुरुवातीनंतर एबीनं ३३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७३, तर विराटनं नाबाद ३३ धावा करताना संघाला २ बाद १९४ धावांचे डोंगर उभे करून दिले. या दोघांनी ४७ चेंडूंत १०० भागीदारी केली. IPL मधील ही त्यांची १०वी शतकी भागीदारी ठरली. शिवाय दोघांनी ३००० धावांची भागीदारीचा विक्रमही नोंदवला. फलंदाजांच्या कामगिरीनंतर ख्रिस मॉरिस, सुंदर आणि चहल यांनी RCBच्या विजयात हातभार लावला. मॉरिस आणि सुंदरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. चहलनं KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेताना ४ षटकांत १२ धावा दिल्या. चहलनं ७ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत आणि ३ बाद १८ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
विजयानंतर चहलनं ट्विट केलं.
त्याच्या या ट्विटला
युवराज सिंगकडून चांगले उत्तर मिळाले. तो म्हणाला,''तू कोणालाच फटके मारू देत नाही आहेस... मलाच पुन्हा मैदानावर उतरावं लागेल!, युझी टॉप क्लास गोलंदाजी केलीस.''
त्यावर चहलनं उत्तर दिलं की,'' मला अजूनही ३ चेंडूंवरील ३ षटकार आठवत आहेत भावा.'' २०१९च्या आयपीएलमध्ये युवीनं चहरच्या तीन चेंडूंवर तीन षटकार खेचले होते.
Web Title: IPL 2020: “Still remember your 3 sixes in 3 balls,” Yuzvendra Chahal says to Yuvraj Singh in a fun Twitter banter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.