ठळक मुद्दे रोमांचक लढतीत राजस्थान रॉयल्सने केला पंजाबने दिलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलागत्याबरोबरच राजस्थानने सर्वात मोठ्या पाठलागाचा आपलाच १२ वर्षे अबाधित असलेला विक्रम काढला होता मोडीतयोगायोगाची बाब म्हणजे २००८ मध्ये राजस्थानने जेव्हा सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग केला होता तेव्हा त्या हंगामात राजस्थानने आयपीएलच्या विजेतेपदावर केला होता कब्जा
शारजाह - यंदाच्या आयपीएलमध्ये रविवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक लढतीत राजस्थान रॉयल्सने पंजाबने दिलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत थरारक विजयाची नोंद केली. या विजयासोबतच राजस्थानने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करतानाच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. त्याबरोबरच राजस्थानने सर्वात मोठ्या पाठलागाचा आपलाच १२ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात २००८ राजस्थान रॉयल्सने डेक्कन चार्जर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. आता रविवारी संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ आणि राहुल तेवटियाच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने २२४ धावांच्या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग केला. आता यामधील योगायोगाची बाब म्हणजे २००८ मध्ये राजस्थानने जेव्हा सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग केला होता तेव्हा त्या हंगामात राजस्थानने आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला होता. आता यंदाच्या हंगामात तब्बल १२ वर्षांनी राजस्थानने आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. आता राजस्थानचा संघ आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा करतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय
काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मयांक अग्रवालचे आयपीएल मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर ङकढनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. त्यांना राजस्थान रॉयल्सकडून ( फफ) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसननं यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. पण, मोहम्मद शमीनं टाकलेलं 17 वे षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरलं असं वाटलं, परंतु राहुल तेवाटिया ज्या पद्धतीनं खेळला त्याला तोडच नाही. राहुलच्या या फटकेबाजीनं फफला विजय मिळवून दिला.
राहुल तेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत षटकार; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी
अपेक्षित धावगती वाढल्याने राजस्थानच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवंर चार खणखणीत षटकार खेचून सामना 14 चेंडूंत 27 धावा असा चुरशीचा बनवला. राहुलनं 18व्या षटकात पाच षटकारांसह 30 धावा चोपल्या. 12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राजस्थानला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. टॉम कुरनने चौकार मारून राजस्थानचा विजय पक्का केला. राजस्थानने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.
Web Title: IPL 2020: Strange Coincidence! ... so Rajasthan will be the IPL champions this year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.