ठळक मुद्दे19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार लिलाव73 जागांसाठी 971 खेळाडू रिंगणात; 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. कोलकाता येथे पार पडणाऱ्या या लिलावात एकूण 971 खेळाडू नशीब आजमावणार आहे. यामध्ये 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ 73 खेळाडूंनाच लॉटली लागणार आहे. आठ संघांमध्ये ही चुरस रंगणार आहे. तत्पूर्वी या संघांना अर्ज केलेल्या खेळाडूंमधील शॉर्टलिस्टेड खेळाडूंची यादी आज पाच वाजेपर्यंत आयपीएलकडे सोपवायची आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सने या लिलावासाठी चांगलीच तयारी केली आहे. त्यांनी फलंदाज मिलिंद कुमारला ट्रायलसाठ बोलावलं आहे. त्रिपुराच्या या खेळाडूनं सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2018-19च्या स्थानिक क्रिकेट मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी त्यानं त्रिपुराकडून खेळण्याचा निर्णय घेतला. 28 वर्षीय मिलिंदनं 2018-19च्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्यानंतर मागील मोसमात RCBनं त्याला 20 लाख मुळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून दिले. पण, त्याला दिल्ली कॅपिटल्स प्रमाणे RCB कडूनही खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरल्यास त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते. चार जेतेपद नावावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ मधल्या फळीतील फलंदाजाच्या शोधात आहे. 28 वर्षीय मिलिंदनं 2011मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2013मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्यानं 85 चेंडूंत नाबाद 78 धावांची खेळी केली होती. 2018-09च्या हंगामात त्यानं 121च्या सरासरीनं 1331 धावा चोपल्या आहेत. त्यानं 14 डावांत सहा शतकं व 4 अर्धशतकं झळकावली आहेत.
आठ संघांचा 'बजेट'
चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी - ५ खेळाडू ( २ परदेशी)
दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी - ११ खेळाडू ( ५ परदेशी)
किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी - ९ खेळाडू ( ४ परदेशी)
कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी - ११ खेळाडू ( ४ परदेशी)
राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी- ११ खेळाडू ( ४ परदेशी)
मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)
सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी - १२ खेळाडू ( ६ परदेशी)
Web Title: IPL 2020: Strong preparation for Mumbai Indians; Call Up Former RCB, DC Batsman For Trial
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.