Indian Premier League ( IPL 2020) कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) शनिवारी अनपेक्षित निकालाची नोंद केली. किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्धच्या सामन्यात सुनील नरीननं ( Sunil Narine) टाकलेल्या अखेरच्या षटकानं KKRला दोन धावांनी विजय मिळवून दिला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी सात धावा हव्या असताना ग्लेन मॅक्सवेलनं खणखणीत फटका मारला पण सीमारेषेपासून अवघ्या इंचाच्या अंतरावर तो टप्पा घेत चौकार गेला अन् इंचानं सामना KKRनं जिंकला. पण, नरीनची गोलंदाजी शैली वादाच्या भवऱ्यात अडकली आहे.
KKRचा फिरकीपटू सुनील नरीनच्या गोलंदाजी शैलीवर BCCIकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला BCCIनं ताकिद दिली आहे, परंतु अशी तक्रार पुन्हा आल्यास त्याला IPL 2020मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. BCCIच्या समितीनं परवानगी दिल्यानंतरच त्याचा मार्ग मोकळा होईल. ख्रिस गॅफनी आणि उल्हास गंधे यांनी नरीनच्या गोलंदाजीचा रिपोर्ट बीसीसीआयकडे दिला. यापूर्वीही अनेकदा नरीनची शैली वादात अडकली होती.
दिनेश कार्तिक ( ५८) आणि शुबमन गिल ( ५७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकातानं ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात उतरलेल्या KXIP ला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असला, परंतु घडलं वेगळंच. KXIPला रोखण्यासाठी मैदानावर उतरलेल्या KKRला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. आंद्रे रसेलच्या ( Andre Russell) हातून लोकेश राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्यानं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं. एक जीवदान मिळाल्यानंतर राहुलनं संयमी खेळ केला. राहुल-मयांक अग्रवाल या जोडीनं KKRच्या गोलंदाजांना यश मिळवूच दिले नाही. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
15 व्या षटकात KKRला पहिले यश मिळाले. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवाल झेलबाद झाला. मयांकनं 39 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 56 धावा केल्या. मयांक-राहुलनं पहिल्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या. त्यांच्या या खेळीनं KXIPचा विजय पक्काच केला होता, पण अखेरच्या षटकांत KXIPला धक्के बसल्यानं सामन्याची चुरस कायम राहिली. प्रसिध कृष्णानं 19व्या षटकात KXIPला दोन धक्के दिले. त्यात 74 धावा करणाऱ्या लोकेश राहुलचाही समावेश होता. त्यामुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत ताणला आणि KKRनं पुन्हा अशक्यप्राय विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी सात धावा हव्या असताना ग्लेन मॅक्सवेलनं खणखणीत फटका मारला पण सीमारेषेपासून अवघ्या इंचाच्या अंतरावर तो टप्पा घेत चौकार गेला.
Web Title: IPL 2020: Sunil Narine Reported for Bowling With Suspected Illegal Action in KKR vs KXIP Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.