Join us  

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादने कायम राखल्या प्ले ऑफच्या आशा, गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप

IPL 2020 : आरसीबीला ७ बाद १२० धावांवर रोखल्यानंतर हैदराबादने १४.१ षटकांतच ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 5:59 AM

Open in App

शारजाह : गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी नियोजनानुसार केलेल्या खेळाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने महत्त्वपूर्ण विजय मिळवताना फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ५ गड्यांनी नमवले. यासह हैदराबादने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेताना प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.आरसीबीला ७ बाद १२० धावांवर रोखल्यानंतर हैदराबादने १४.१ षटकांतच ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले. युझवेंद्र चहलचा अपवाद वगळता आरसीबीच्या इतर गोलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. कमी धावसंख्येचे दडपण सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दिसू लागले होते. चहलने १९ चेंडूंत २ बळी घेतले. हैदराबादने रिद्धिमान साहा (३९) आणि मनीष पांडे यांनी सावध परंतु खंबीर खेळी केली. त्याआधी, संदीप शर्माने आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल व कर्णधार विराट कोहली यांना बाद केले. दोन फॉर्ममध्ये असलेले फलंदाज झटपट परतल्याने आरसीबीवर दडपण आले. यानंतर जोश फिलिप आणि एबी डिव्हिलियर्स यांनी ४३ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. 

सामन्यातील रेकॉर्ड संदीप शर्माने आयपीएलमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक ७ वेळा बाद करताना आशिष नेहराला     (६) मागे टाकले.आयपीएलच्या पॉवर प्लेमध्ये एकूण ५१ बळी घेताना संदीपने दुसरे स्थान मिळवले. झहीर खान ५२ बळींसह पहिल्या स्थानी.देवदत्त पडिक्कलने टी-२० मध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या.

विनिंग स्ट्रॅटजीसंदीप शर्माने भेदक मारा करीत प्रतिस्पर्धी संघाला माफक धावसंख्येत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना रिध्दिमान साहसह आघाडीच्या फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत विजय निश्चित केला.

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर