मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये अनेक खेळाडूंना दुखापतग्रस्त होताना पाहण्यास मिळत आहे. यामुळे अनेक संघांना याचा फटकाही बसला आहे. आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) महत्त्वपूर्ण सामन्यात भिडणार आहेत. दोन्ही संघांना प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. मात्र आता या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याआधी हैदराबादला धक्का बसला आहे तो हुकमी खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने.कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवण्याची क्षमता असलेला स्टार फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानविरुद्ध तो खेळू शकणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हैदराबादची वाटचाल आता बिकट झाली आहे. विलियम्सनच्या दुखापतीबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार विलियम्सनची दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र असे असले तरी हैदराबाद संघ आपल्या या स्टार खेळाडूबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विलियम्सनला दुखापत झाली होती. या सामन्यात विलियम्सन सलामीला फलंदाजीला आला होता. या सामन्यानंतर वॉर्नरने माहिती दिली होती की, विलियम्सनला दुखापतीने ग्रासले असून त्याला धावताना त्रास होत होता.विलियम्सन दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला होता. जर आता विलियम्सन खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी याला हैदराबादच्या अंतिम संघात स्थान मिळू शकेल. विशेष म्हणजे विलियम्सनच्या अनुपस्थितीत नबीने चांगला खेळ केला होता. मात्र नंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020: हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा झाला दुखापतग्रस्त
IPL 2020: हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा झाला दुखापतग्रस्त
IPL 2020 SRH Kane Williamson: राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी हैदराबादला धक्का; संघाच्या चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 3:14 PM