भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) साठी सज्ज झाला आहे. आयपीएल होणार असल्याची घोषणा झाल्यापासून सुरेश रैना कसून सरावाला लागला. त्यानं नेट्समध्ये कसून सरावही केला आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती येथे होणार आहे आणि केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर आता सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्व संघ यूएईत दाखल होणे अपेक्षित आहेत आणि त्यामुळे खेळाडूही तयारीला लागले आहेत. आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी सुरेश रैनानं शरिरावर टॅटू काढले आहेत. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन
पत्नीसोबत ड्राईव्हसाठी बाहेर पडला रवींद्र जडेजा; मास्कवरून महिला पोलिसांसोबत हुज्जत
टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि सुरेश रैना यांनी फलंदाजीचा सराव केला होता. या दोघांनी सोबत सराव केला आणि एकत्र आईस बाथही घेतला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरेश रैनानं सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात दोन्ही खेळाडू कसून सराव करताना पाहायला मिळत आहेत आणि रैना पंतला काही टिप्सही देत आहे. त्यानंतर दोघांनी एका पोर्टेबल स्वीमिंग पूलमध्ये बसून आईस बाथ केला. या पूलमध्ये बर्फ ठेवण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सुरेश रैनाच्या घरी पाळणा हलला होता. 23 मार्चला त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. 2016मध्ये मुलगी झाली होती आणि तिचं नाव गार्सिया असं ठेवण्यात आले होते. सुरेश रैनानं मुलाचं नाव रिओ असं ठेवलं आहे. रैनानं आयपीएलसाठी रवाना होण्यापूर्वी हातावर मुलगा-मुलगी आणि पत्नीचं नाव गोंदवलं आहे..
सुरेश अन् प्रियंकाची लव्ह स्टोरी...सुरेश आणि प्रियंका हे बालपणीचे मित्र. लहानपणी ते एकाच कॉलनीत राहायचे. प्रियंकाचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आणि या दोघांचा संपर्क तुटला. प्रियंकाचे बाबा हे सुरेशचे शाळेमध्ये क्रीडा शिक्षक होते, तर या दोघांच्या आई या चांगल्या मैत्रिणी होत्या. बराच काळ सुरेश आणि प्रियंका हे संपर्कात नव्हते. पण २००८ साली या दोघांनी विमानतळावर पुन्हा एकदा भेट झाली.
त्यावेळी सुरेश आयपीएलसाठी बंगळुरुला जात होता, तर प्रियंका ही नेदरलँड्सला आपल्या जॉबसाठी चालली होती. तेव्हा या दोघांचे बोलणे झाले. सुरेश जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होता तेव्हा त्याच्या आईने त्याला कॉल करून तुझे लग्न ठरवल्याचे सांगितले. रैनाने यावेळी आईला विचारले की, ती मुलगी आहे तरी कोण? त्यावेळी आईने सुरेशला प्रियंकाचे नाव सांगितले. आपले लग्न प्रियंकाबरोबर झाल्याचे समजताच सुरेशने तिला फोन केला आणि ही माहिती दिली.३ एप्रिल २०१५ या दिवशी सुरेश आणि प्रियंका यांचे लग्न झाले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार
Video : 140 किलोच्या रहकीम कोर्नवॉलच्या नावावर आहे CPLमधील 'वजन'दार विक्रम!
कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!
संधी मिळाल्यास अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नक्की येईन; पाकिस्तानी क्रिकेटपटूची इच्छा
Web Title: IPL 2020: Suresh Raina has his wife and kids name tattooed ahead of leaving for UAE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.