इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्व संघांनी त्यांच्या ताफ्यातील परदेशी खेळाडूंना दुबईत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी IPL फ्रँचायझींनी तगडी रक्कम मोजून चार्टर्ड विमान भाड्यानं घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. IPL 2020 Auctionमध्ये 62 परदेशी खेळाडूंवर 197 कोटी बोली लावण्यात आली आहे. त्यामुऴे प्रत्येक फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंसाठी बक्कळ पैसा ओतण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाला आपल्या ताफ्यातील परदेशी खेळाडू ऑन टाईम दुबईत हवा आहे.
Chennai Super Kingsचे दोन तगडे खेळाडू IPL 2020च्या पहिल्या सामन्याला मुकणार
कोणत्या देशातील खेळाडूंसाठी किती रक्कम मोजली?
- ऑस्ट्रेलियाचे - 17 खेळाडू - एकूण रक्कम 86 कोटी 75 लाख
यंदाच्या आयपीएलमध्ये 8 विविध संघात ऑस्ट्रेलियाचे 17 खेळाडू खेळणार आहेत. पॅट कमिन्सला आयपीएल लिलावात सर्वाधिक 15.5 कोटींची बोली लावून कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) आपल्या ताफ्यात घेतलं. पण, ही रक्कम मिळवण्यासाठी त्याला आयपीएलमध्ये खेळावे लागेल.
- वेस्ट इंडिज - 10 खेळाडू, एकूण रक्कम - 49 कोटी 75 लाख
- इंग्लंड - 13 खेळाडू, एकूण रक्कम - 47 कोटी 50 लाख
- अफगाणिस्तान - 3 खेळाडू, एकूण रक्कम - 14 कोटी
- न्यूझीलंड - 6 खेळाडू, एकूण रक्कम - 9 कोटी 80 लाख
- श्रीलंका - 2 खेळाडू, एकूण रक्कम - 2 कोटी 50 लाख
- नेपाळ - 1 खेळाडू, एकूण रक्कम - 20 लाख
मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी!
CSKच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी MS Dhoniचा 'धाडसी' निर्णय; तुम्हीही कराल कौतुक
यातील 22 परदेशी खेळाडूंना दुबईत आणण्यासाठी सात फ्रँचायझींनी चार्टर्ड विमान भाड्यानं घेतलं असून त्यासाठी त्यांनी 1 लाख पाऊंड म्हणजे जवळपास 1 कोटी रक्कम मोजली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 16 सप्टेंबरला ही मालिका संपणार आङे. त्यांच्या मँचेस्टर ते दुबई अशा प्रवासासाठी हे विमान बूक केलं गेलं आहे.
कोणत्या खेळाडूंसाठी खास सुविधाडेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, इयॉन मॉर्गन, अॅरोन फिंच, पॅट कमिन्स, टॉम बँटन, जोफ्रा आर्चर हे त्या 22 जणांमधील प्रमुख खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सचा एकही खेळाडू ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मालिकेतील सदस्य नसल्यानं त्यांनी विमान बूक केलं नाही.
खेळाडूंना सहा दिवसांचा क्वारंटाईन अनिवार्यपरदेशातून येणाऱ्या या खेळाडूंना नियमाप्रमाणे 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) चा संघ अबु धाबी येथे राहत आहे आणि त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावाच लागेल. त्यामुळे त्यांनी वेळापत्रकात त्यांचे सामने उशीरा ठेवण्याची विनंती केली होती. मॉर्नग, बँटन आणि कमिन्स हे तीन खेळाडू KKRचे सदस्य आहेत आणि ते 23 सप्टेंबरचा सामना खेळण्यास पात्र ठरतील.
IPL 2020च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची समुद्रकिनारी सफर, Video
राजस्थान रॉयल्सचा 'युवा' जोश; IPL 2020मध्ये यंग ब्रिगेड सर्वांवर भारी पडणार!