IPL 2020 : थँक यू सीएसके, आयपीएल, यूएई; शार्दुल ठाकूरची भावनिक पोस्ट

यंदाच्या सत्रात निराशजनक कामगिरी झाल्यानंतरही चाहत्यांनी सीएसकेचे समर्थन मात्र सोडले नाही. यासाठीच आता सीएसकेचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) एक भावनिक मेसेज पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 02:53 PM2020-11-02T14:53:31+5:302020-11-02T14:55:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Thank you CSK, IPL, UAE Shardul Thakurs emotional post | IPL 2020 : थँक यू सीएसके, आयपीएल, यूएई; शार्दुल ठाकूरची भावनिक पोस्ट

IPL 2020 : थँक यू सीएसके, आयपीएल, यूएई; शार्दुल ठाकूरची भावनिक पोस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : यंदाचे Indian Premier League (IPL 2020) सत्र चेन्नई सुपरकिंग्जसाठी (Chennai SUperkings) अत्यंत निराशाजनक ठरले. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. त्याचवेळी, अखेरचा साखळी सामना होण्याआधीपर्यंत त्यांना अखेरच्या स्थानावर रहावे लागले होते. मात्र अखेरच्या साखळी सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) एकतर्फी पराभव करत चेन्नईने अखेरचे स्थान टाळले. याचा काय तो यंदा चेन्नईला दिलासा मिळाला. यंदाच्या सत्रात निराशजनक कामगिरी झाल्यानंतरही चाहत्यांनी सीएसकेचे समर्थन मात्र सोडले नाही. यासाठीच आता सीएसकेचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) एक भावनिक मेसेज पोस्ट केला असून, याद्वारे त्याने चाहत्यांचे विशेष आभारही मानले आहेत.

सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा शानदार पराभव करत चेन्नईने यंदाच्या सत्राची शानदार सुरुवात केली. मात्र यानंतर त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव राहिला. त्याचप्रमाणे, सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनी स्पर्धा सुरु होण्याआधीच माघार घेतल्याने सीएसके सुरुवातीपासूनच अडचणीत सापडले होते. त्यातच रैनाचा पर्याय म्हणून संघात आलेला ॠतुराज गायकवाड हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला, तर अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्रावो या अनुभवी खेळाडूंच्या दुखापतीचाही फटका सीएसकेला बसला.

स्पर्धेतील अखेरचा सामन्यानंतर शार्दुलने इन्स्टाग्रामवर भावनिक संदेश देताना चाहत्यांचे, संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. शार्दुलने म्हटले की, ‘आमच्यासाठी आयपीएलचे सत्र संपले असून नक्कीच हे चांगले सत्र ठरले नाही. सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ व्यवस्थापन यांनी पूर्ण मेहनत घेतल्यानंतरही आम्ही अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलो.  आम्ही जे काही सामने जिंकलो त्यातून खूप काही शिकलो असून झालेल्या पराभवाचे खूप दु:खही झाले आहे. ते आता विसरणार आहे. सर्वात महत्त्वाचे आमच्या चाहत्यांनी सुरुवातीपासून आम्हाला पाठिंबा दर्शवला आणि नेहमी आमच्या पाठिशी उभे राहिले. य सर्व चाहत्याचे खूप खूप आभार. चेन्नई सुपरकिंग्ज एक परिवारासारखे आहे. कोविडची परिस्थिती पाहता यंदाचे आयपीएल सत्र अनोख्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य ती सर्व काळजी घेतली. थँक यू सीएसके, आयपीएल आणि यूएई. चीअर्स!’

Web Title: IPL 2020 Thank you CSK, IPL, UAE Shardul Thakurs emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.