IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका

जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे आणि त्याचा परिणाम क्रीडा विश्वावरही जाणवत आहे. जगभरात होणाऱ्या विविध स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्या प्रेक्षकांविना खेळवल्या जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:05 PM2020-03-15T12:05:18+5:302020-03-15T12:05:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: "There's no joy without crowds" opines Virender Sehwag svg | IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका

IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे आणि त्याचा परिणाम क्रीडा विश्वावरही जाणवत आहे. जगभरात होणाऱ्या विविध स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्या प्रेक्षकांविना खेळवल्या जात आहेत. इंडियन प्रीमिअर लीगचा १३वा मोसमही होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. श्रीलंका, इंग्लंड आणि भारतातील आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करण्यात आल्या. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला वन डे सामना बंद दरवाजात झाला. त्यानंतर स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय झाला. 

२९ मार्चला सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अजूनही आयपीएल होईल की नाही, हे चित्र स्पष्ट झालेले नाही. झालीच तर ती बंद दरवाजात होईल, याची शक्यता अधिक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धा रद्द झाली. या लीगमध्ये खेळणारा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं प्रेक्षकांविना क्रिकेट या संकल्पनेवर नाराजी प्रकट केली. पण, त्याचवेळी त्यानं कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी लोकांना गर्दीपासून दूर ठेवणेच योग्य असल्याचेही कबुल केले.

तो म्हणाला,''मी केवळ स्थानिक क्रिकेट रिकाम्या स्टेडियममध्ये खेळलो आहे. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजपर्यंत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये मी खेळलो. प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही. तुम्ही चौकार-षटकार लगावल्यावर कोणी टाळ्या वाजवणारं नसेल, कोहली... कोहली किंवा धोनी... धोनी असा गजर नसेल, सर्व निरस वाटेल. पण, सद्यस्थिती पाहता लोकांना स्टेडियमवर प्रवेश न देणंच महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असली, तर अशा वेळी त्याचा प्रसार अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे.''
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही

Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली

वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला

IPL 2020 : आयपीएल होणार की नाही? BCCIच्या बैठकीत सात पर्यायांवर झाली चर्चा

Web Title: IPL 2020: "There's no joy without crowds" opines Virender Sehwag svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.