मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये सलग दोन सामने जिंकून जबरदस्त सुरुवात केलेल्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) नंतर कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यात आज त्यांचा सामना होणार आहे तो फॉर्ममध्ये आलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians). त्यामुळेच अत्यंत संतुलित संघासह राजस्थानला मुंबईविरुद्ध भिडावे लागेल. त्यादृष्टीने कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) पावलेही उचलली असून त्याने संघात महत्त्वाचे बदल केल्यास मुंबईचा युवा सलामीवीर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना दिसेल. हा युवा सलामीवीर म्हणजे यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal).
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी स्मिथने म्हटले की, ‘स्पर्धेची चांगल्या प्रकारे सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन सामन्यांत आम्ही नियोजनबद्ध खेळ करु शकलो नाही. माझ्यामते टी-२० क्रिकेटमध्ये असे कधी कधी होत असते.’ पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यानंतर स्मिथ अपयशी ठरला. याबाबत त्याने म्हटले की, ‘मुंबईविरुद्ध धावा काढण्यात मला यश येईल, अशी आशा आहे. गेल्या दोन लढतीत मी अयपशी ठरलो.’
राजस्थानला वेगवान सुरुवातीसाठी सलामीवीर जोस बटलरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र तोही गेल्या तीन सामन्यांत केवळ ४७ धावाच करु शकला. याशिवाय संघातील अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाही सपशेल अपयशी ठरला आहे. गेल्या चार डावांत मिळून त्याने केवळ ३३ धावाच केल्या आहेत. त्यामुळेच त्याच्या फॉर्मचीही संघाला चिंता आहे.
यंदा प्रथमच स्मिथने डावाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यांत यशस्वी ठरल्यानंतर तो अपयशी ठरला. शिवाय उथप्पाही मधल्या फळीत फ्लॉप ठरला आहे. त्यामुळेच स्मिथ पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि उथप्पाला संघाबाहेर बसवून युवा यशस्वी जैस्वाल याला खेळवू शकतो. असे झाल्यास यशस्वी बटलरसह डावाची सुरुवात करेल आणि स्मिथच्या उपस्थितीमध्ये राजस्थानच्या मधल्या फळीला मजबूतीही मिळेल. त्याचप्रमाणे राजस्थानला डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीचीही चिंता आहे.
Web Title: IPL 2020: today Mumbai's attacking opener (Yashasvi Jaiswal will play against Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.