Join us  

IPL 2020 : आयपीएलची सर्वव्यापकता अधोरेखित

IPL 2020: फक्त कल्पना करा, हे सात-आठ वर्षे आधी झाले असते तर. त्यांना आयपीएलचा फायदा मिळत असल्यामुळे मी आनंदी आहे. पीटरसन याने दशकभरापूर्वी आयपीएलचा मोठ्या मनाने स्वीकार केला होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 3:29 AM

Open in App

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग इडिटर, लोकमत)

आयपीएलमधील उत्पन्न, प्रेक्षक संख्या, खेळाडूंची गुणवत्ता याबाबतीत इतर कोणत्याही टी-२० लीगपेक्षा जास्त आहे. कोविड महासाथीने क्रीडा कॅलेंडरला अडचणीत आणले. पण आयपीएल मात्र झाली. फक्त स्पर्धा घेणे किंवा आर्थिक फायदा घेणे एवढेच नाही तर बीसीसीआयला अधिक सक्रिय राहावे लागेल. कदाचित आणखी काही संघ स्पर्धेत वाढवावे लागतील. त्यामुळे होणारी स्पर्धा जबरदस्त असेल.

शुक्रवारी ट्विटरवर इंग्लंड क्रिकेट टीमने राजस्थान रॉयल्सचे जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्यांचे छायचित्रही प्रसिद्ध केले. यामुळे आयपीएलची सर्वव्यापकता अधोरेखित झाली आहे. त्यावर माजी कर्णधार केविन पीटरसन याने हे रिट्विट केले आणि म्हटले की,फक्त कल्पना करा, हे सात-आठ वर्षे आधी झाले असते तर. त्यांना आयपीएलचा फायदा मिळत असल्यामुळे मी आनंदी आहे. पीटरसन याने दशकभरापूर्वी आयपीएलचा मोठ्या मनाने स्वीकार केला होता. तेव्हा त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. तो लीगमध्ये जास्त पगार घेणारा एक परदेशी व्यावसायिक खेळाडू होता. मात्र त्याचे कौतुक कुणीही केले नाही.काही मोजके इंग्लिश खेळाडू या लीगचा भाग होते. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा इंग्लिश खेळाडू आहेत. इयॉन मॉर्गन, सॅम कुरेन, टॉम कुरेन, जोस बटलर,जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, मोईन अली, टॉम बंटन, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स. वोक्स अखेरच्या क्षणी बाहेर पडला, अन्यथा ११ उत्तम पांढऱ्या चेंडूने खेळणारे खेळाडू त्यात राहिले असते. पीटरसनच्या वेळी त्याकडे संशयाने पाहिले जात होते.अर्थात आयपीएल कधीही इंग्लिश खेळाडूंवर अवलंबून नव्हती. त्यात सर्वच देशांचे खेळाडू होते. सुरुवातीला दोन सत्रात पाकिस्तानी खेळाडूही होते. त्यांच्या सहभागाने आयपीएलची व्यापकता वाढते एवढेच. आयपीएल ही किती महत्त्वाची झाली आहे हे फक्त यावरूनच कळते की, कोविड या महासाथीतही आयसीसीने त्यासाठी वेळ काढला आहे. 

टॅग्स :IPL 2020