मुंबई - चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Superkings) बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध Kolkata Knight Riders) झालेल्या १० धावांच्या पराभवानंतर केदार जाधव (Kedar Jadhav) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. १२ चेंडूंत केवळ ७ धावा केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. धावांचा पाठलाग करताना जाधवला रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो यांच्याआधी फलंदाजीला पाठवले होते. मात्र जाधव अपयशी ठरला आणि यानंतर सोशल मीडियावर केदारवर मीम्सचा पाऊस पडला.
जरी केदार या सामन्यात सपशेल अपयशी ठरला असला, तरी या सामन्यातून त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मात्र हा असा विक्रम आहे, जो कोणत्याही फलंदाजाला नकोसा वाटेल. यंदाच्या आयपीएलमध्ये केदारने आतापर्यंत ५९ चेंडूंचा सामना केला आहे, मात्र या खेळीदरम्यान त्याला अद्याप एकही षटकार ठोकता आलेला नाही. गेल्या चार डावांमध्ये केदारने २२, २६, ३ आणि ७ धावांची खेळी केली आहे. मात्र या चार डावांमध्य त्याला एकही षटकार ठोकता आलेला नाही.
यंदा सर्वाधिक चेंडू खेळूनही एकही षटकार न ठोकलेल्या फलंदाजांमध्ये केदारने अव्वल स्थान पटकावले आहे. केवळ केदारच नाही, तर या यादीमध्ये क्रिकेटविश्वातील अनेक स्टार फलंदाजांचा समावेश आहे. केदारनंतर दुसरा क्रमांक लागतो तो पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा. मॅक्सवेलने ५६ चेंडू खेळले असून त्याने अजून एकही षटकार ठोकलेला नाही.
त्याचप्रमाणे, या यादीमध्ये सनरायझर्स हैदराबादचा केन विलियम्सन, कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक, चेन्नईचा मुरली विजय आणि राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पा यांचाही समावेश आहे.
सर्वाधिक चेंडू खेळून एकही षटकार न ठोकलेले फलंदाज
फलंदाज सामने डाव धावा खेळलेले चेंडू
१. केदार जाधव ०६ ०४ ५८ ५९
२. ग्लेन मॅक्सवेल ०६ ०६ ४८ ५६
३. केन विलियम्सन ०४ ०४ ७३ ५४
४. दिनेश कार्तिक ०५ ०५ ४९ ४८
५. मुरली विजय ०३ ०३ ३२ ४३
६. रॉबिन उथप्पा ०४ ०४ ३३ ४२
Web Title: IPL 2020: Unique record in the name of Kedar Jadhav!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.