KKRवरील विजयानं मुंबई इंडियन्स थेट पहिल्या स्थानी; जाणून घेऊया Points Tableमध्ये अन्य संघांची क्रमवारी

मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders ) 49 धावांनी विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 24, 2020 07:30 AM2020-09-24T07:30:00+5:302020-09-24T07:30:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Updated points table, orange cap, purple cap standings after MI vs KKR match | KKRवरील विजयानं मुंबई इंडियन्स थेट पहिल्या स्थानी; जाणून घेऊया Points Tableमध्ये अन्य संघांची क्रमवारी

KKRवरील विजयानं मुंबई इंडियन्स थेट पहिल्या स्थानी; जाणून घेऊया Points Tableमध्ये अन्य संघांची क्रमवारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders ) 49 धावांनी विजय मिळवला. अबु धाबी येथील Sheikh Zayed Cricket Stadiumवर झालेल्या सामन्यात MI ने Indian Premier League (IPL) 2020 मघील पहिल्या विजयाची नोंद केली. रोहित शर्माची वादळी खेळी आणि सुर्यकुमार यादवच्या उपयुक्त 47 धावानंतर MI गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावताना KKRला हार मानण्यास भाग पाडले. (MI vs KKR Latest News & Live Score)

रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

सुर्यकुमार यादव (47) आणि रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून केलेल्या 80 धावांच्या जोरावर MIला 20 षटकांत 5 बाद 195 धावा करता आल्या.  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. KKRला 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या. या विजयानंतर मुंबई इंडियन्सनं ( MI) आयपीएल गुणतालिकेतही (  points table) खाते उघडले. जाणून घेऊया या सामन्यानंतर कोणता संघ कितव्या स्थानी.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) फॅफ डू प्लेसिल ( Faf du Plessis) अव्वल स्थानावर आहे. त्याने दोन सामन्यांत 130 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 92 धावांसह दुसऱ्या, तर किंग्स इलेव्हन पंजाबचा मयांक अग्रवाल ( 89) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


Chennai Super Kingsचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन 4 विकेटसह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.  

Web Title: IPL 2020: Updated points table, orange cap, purple cap standings after MI vs KKR match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.