RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला.
राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला
मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.
निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video
मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम
RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकात 30 धावा चोपल्या. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.
IPL 2020 Point Tableकिंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) वरील विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं ( RR) चार गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स ( DC) +1.10 नेट रनरेटनुसार अव्वल स्थानी आहे.
Orange Cap 2020ऑरेंज कॅपच्या अर्थात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) दोन खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर आहे. आजच्या सामन्यातील शतकवीर मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) तीन सामन्यांत 221 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) अवघ्या एका धावेनं अव्वल स्थानी आहे.
Purple Cap 2020पर्पल कॅप अर्थात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत मोहम्मद शमी ( 7 बळी) अव्वल स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कागिसो रबाडा व चेन्नई सुपर किंग्सचा सॅम कुरन प्रत्येकी पाच विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे
मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम