कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यात अजूनही इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) स्पर्धा होणार की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण, अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या घोषणेनं आयपीएलच्या 13 वे मोसम जवळपास रद्दच समजले जात आहे. मोदींनी मंगळवारी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता मोठा धक्क बसण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यानं यंदाची आयपीएल स्पर्धा 29 मार्चला सुरु होणार होती. पण, कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मोदींनी जाहीर केलेले लॉकडाऊन हे 14 एप्रिल पर्यंत असणार आहे. मात्र, त्यानंतरही ही स्पर्धा सुरू होईल याची शक्यता फार कमीच आहे. लोकांच्या जीवापेक्षा स्पर्धा महत्त्वाची नाही, असा पवित्रा काही फ्रँचायझी मालकांनी घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा यंदा होणार नाही हे निश्चितच आहे.
त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अधिकाऱ्यानं ऑलिम्पिक रद्द होऊ शकते, मग आयपीएल तर ऑलिम्पिकच्या तुलनेत खुप छोटी स्पर्धा आहे असे मत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकार परदेशी नागरिकांना व्हिसा देत नाही. त्यात हा 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. प्रत्येक जण परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहे, परंतु तरीही अनेक निर्बंध केंद्र सरकारकडून लादली गेली आहेत आणि त्यामुळे यंदा आयपीएल रद्द करणे, हाच योग्य निर्णय असेल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं मात्र याबाबत अजूनही भाष्य केलेले नाही. त्यानं अजूनही वेट अँड वॉचची भूमिका कायम राखली आहे. तो म्हणाला, दहा दिवसांपूर्वी आम्ही जिथे होतो आताही तिथेच आहोत. त्यामुळे आयपीएल बाबत अजून निर्णय झालेला नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत
सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार
संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण
Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन