इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या मोसमासाठी सर्वच आतुर आहेत. आयपीएल 2020 मध्ये अनेक नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहेत. येथे नो बॉल वर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा पंच असणार आहे. एकादा खेळाडू सामना सुरू असताना जखमी झाल्यास बदली खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना दिसणार आहे. असे अनेक बदल यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार आहे. त्यात विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकाच संघातून खेळणार आहेत, असं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण, हो हे खरं आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी एकाच संघातून खेळणार आहेत.
आयपीएल 2020 चे मोसम ते 29 मार्च ते 24 मे या कालावधीत खेळवणार येणार असल्याची घोषणा सोमवारी गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं केली. स्पर्धेचा उद्घाटनीय आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. यंदा आयपीएलचा उद्धाटन सोहळा थाटामाटात होणार नाही. आयपीएलच्या या मोसमाच्या तीन दिवसआधी एक चॅरीटी सामना खेळवण्यात येणार आहे.
उत्तर भारत आणि पूर्व भारत अशा दोन संघांमध्ये हा सामना होणार आहे. त्यानुसार दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या चार संघांतील खेळाडूंचा एक संघ, तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा एक अशा दोन सघांमध्ये ही चॅरीटी मॅच होणार आहे. गांगुली आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी हा प्रस्ताव मान्य केल्याची बातमी ESPNCricinfoनं दिली आहे.
त्यामुळे या सामन्यात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आदी खेळाडू एकाच संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतील. दुसऱ्या संघात आंद्रे रसेल, रिषभ पंत, बेन स्टोक्स, जोस बटलर, श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन आणि जोफ्रा आर्चर अशी तगडी फौज असेल. या सामन्याचं ठिकाण अद्याप ठरवण्यात आलेले नाही.
Video : विराट कोहलीचा खतरनाक स्टंट; पाहाल तर 'उडाल'!
आयपीएल आयोजनासाठी अमेरिकन कंपनीला दिले जातात 35 कोटी, जाणून घ्या कारण
आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...
हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...
Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा