आवडत्या मैत्रिणीशी बोलायचं असल्यास, चॅटवर संवादाची सुरवात करायची असल्यास मराठी मुलांचा एक ठरलेला प्रश्न असतो. हा प्रश्न प्रचंड फेमस आहे. इतका की अगदी यावर मीम्स तयार होतात. ते व्हायरल होतात. अहो, किती वेळ तो एकच प्रश्न विचारणार? काहीतरी नवीन विचारा की, असं म्हणण्याची वेळ यावी, इतका हा प्रश्न तरुणींना सवयीचा झालाय. मध्यंतरी तुमच्याकडे काय म्हणतोय कोरोना, असा एक प्रश्न येऊन गेला. पण तो काही दिवसांपुरता. त्यानंतर पुन्हा हाच प्रश्न मराठी मुलं विचारू लागली. हा प्रश्न म्हणजे 'जेवलीस का?'जेवलीस का..? याच प्रश्नामुळे अनेक मुलांचा संवाद सुरू होता. याच प्रश्नामुळे काहींचं जुळतंदेखील. या प्रश्न तसा फारसा टाळता नाही. याशिवाय या प्रश्नात काळजीदेखील आहे. त्यामुळे या प्रश्नामुळे संवादाची गाडी पुढे सरकण्याची शक्यताही जास्त असते. लाखो मराठी तरुण तरुणींना विचारत असलेला हाच प्रश्न आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला विचारला आहे. तोही थेट अगदी मैदानावरून.ऑसी दौऱ्यासाठी संघात निवड न झालेल्या सूर्यकुमार यादवनं दिली विराट कोहलीला टशन, Video
- Cricket Buzz»
- बातम्या»
- VIDEO: लाखो मराठी तरुण तरुणींना विचारतात; तोच प्रश्न विराट अनुष्काला विचारतो तेव्हा...
VIDEO: लाखो मराठी तरुण तरुणींना विचारतात; तोच प्रश्न विराट अनुष्काला विचारतो तेव्हा...
IPL 2020 RCB Virat Kohli Anushka Sharma: विराट-अनुष्काचा 'इशारो इशारोमें' संवाद सोशल मीडियावर व्हायरल
By कुणाल गवाणकर | Published: October 29, 2020 9:51 AM