IPL 2020 : विराट कोहलीच्या नावावरील नकोसा विक्रम रॉबिन उथप्पानं मोडला; RCBचा कर्णधार आनंदी झाला

शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली

By स्वदेश घाणेकर | Published: October 1, 2020 03:46 PM2020-10-01T15:46:27+5:302020-10-01T15:49:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Virat Kohli's unwanted record broken; Robin Uthappa has now suffered the most defeats in IPL history | IPL 2020 : विराट कोहलीच्या नावावरील नकोसा विक्रम रॉबिन उथप्पानं मोडला; RCBचा कर्णधार आनंदी झाला

IPL 2020 : विराट कोहलीच्या नावावरील नकोसा विक्रम रॉबिन उथप्पानं मोडला; RCBचा कर्णधार आनंदी झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला. शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या सामन्यानंतर RRचा मधल्या फळीतील फलंदाज रॉबिन उथप्पा ( Robin Uthappa) याच्या नावावरही नकोसा विक्रम नोंदवला गेला. विराट कोहली ( Virat Kohli) याच्या नावावर हा विक्रम होता.

जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं होतं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. मॉर्गननं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 9 बाद 137 धावा करता आल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या. 

या पराभवासह IPLमध्ये सर्वाधिक पराभव पत्करणाऱ्या खेळाडूचा नकोसा विक्रम उथप्पाच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीच्या नावावर IPLमध्ये 90 पराभव आहेत, पण आता उथप्पा 91 पराभवासह अव्वल स्थानाव गेला आहे. RCBचा कर्णधार कोहलीची IPLमध्ये कामगिरी फार ग्रेट झालेली नाही. उथप्पानं IPLमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने KKRकडून 2014मध्ये IPL जेतेपद पटकावले आहे.

IPLमध्ये सर्वाधिक पराभव पत्करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट व उथप्पानंतर KKRचा दिनेश कार्तिक ( 87 पराभव), मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा ( 85 पराभव) यांचा क्रमांक येतो. अमित मिश्रा आणि एबी डिव्हिलियर्स 57 पराभवांसह पाचव्या स्थानावर आहेत.   

 

Web Title: IPL 2020 : Virat Kohli's unwanted record broken; Robin Uthappa has now suffered the most defeats in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.