यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai Superkings) मंगळवारी दमदार पुनरागमन करताना सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hydrabad) २० धावांनी नमवले. या सामन्यात केलेल्या खेळाबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwagh) सीएसकेचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच सीएसकेच्या कामगिरीवर सेहवागने टीका केली होती. मात्र आता त्याने सीएसकेचे कौतुक करतानाच कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) हिरो ठरवले आहे. धोनी हा सीएसकेचा गब्बर आहे, असे म्हणत सेहवागने धोनीचे केस उन्हामध्ये नाही पिकले, अशी हटके कमेंटही केली आहे.
यंदाच्या आयपीएलदरम्यान सेहवाग ‘वीरु की बैठक’ नावाचा आपला शो सोशल मीडियावर घेऊन आला आहे. यामध्ये प्रत्येक सामन्याचे हटक्या पद्धतीने विश्लेषण करत तो चाहत्यांचे मनोरंजनही करत आहे. मंगळवारी सीएसकेने हैदराबादचा पराभव केल्यानंतर धोनीने सेहवागच्या नेतृत्त्वावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी सेहवागने धोनीला ‘गब्बर’ असे म्हटले असून चेन्नईला कोणत्याही संघाकडून एकच व्यक्ती वाचवू शकतो आणि तो खुद्द धोनीच आहे. सेहवागने धोनीच्या नेतृत्त्व आणि रणनितीचेही कौतुक केले.
सॅम कुरनला सलामीला पाठविण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना सेहवागने सीएसकेच्या फलंदाजांच्या सकारात्मक मानसिकतेची प्रशंसा केली. या शोमध्ये सेहवाग म्हणाला की, ‘जणू काही धोनीने सर्व फलंदाजांना वॉर्निंग दिली होती की, जास्त चेंडू खाऊन बाद झाले, तर जेवण मिळणार नाही.’
धोनीने आखलेल्या रणनितीचेही कौतुक करताना सेहवाग म्हणाला की, ‘धोनीकडे असलेला अनुभव त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे ठरवते. त्याने आपले केस उन्हामध्ये नाही पिकवले.’ यावेळी धोनीने सीएसकेच्या खेळाडूंसह हैदराबादच्या केन विलियम्सनचेही कौतुक केले. त्याने म्हटले की, ‘विलियम्सनची परिस्थिती अशी होती की, जणू पूर्ण क्लासचा होम-वर्क करणे तो एकटाच बसला होता.’
Web Title: IPL 2020 virender sehwag praises ms dhoni captaincy after csk defeats srh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.