दुबई : सनरायजर्स हैदराबादचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा हा काल दिल्लीविरुद्ध फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जांघेच्या आणि कमेरच्या मधल्या जागेत दुखणे उमळले. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने यष्टिरक्षण केले नाही. ही उणीव बदली खेळाडू श्रीवत्स गोस्वामी याने भरून काढली. साहाची जखम गंभीर नसली तरी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाचा सल्ला घेतल्यानंतरच साहाला पुढील सामना खेळवण्याचा निर्णय घेणार असल्याचे सनरायजर्सने स्पष्ट केले.४५ चेंडूत ८७ धावांच्या खेळीदरम्यान साहाला दुखणे उमळले होते. साहाचा पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेिलया दौरा करणाऱ्या भारताच्या कसोटी संघात समावेश आहे. बीसीसीआयने फ्रॅन्चाईजींना राष्ट्रीय संघात असलेल्या खेळाडूंच्या दुखापतीबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. साहाला पुढील दोन सामन्यात विश्रांतीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
सचिन, शास्त्रींकडून साहाचे कौतुकनवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सिवरुद्ध ८७ धावा ठोकणारा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा याच्या खेळीचे सचिन तेंडुलकर आणि राष्ट्रीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी कौतुक केले. सचिन म्हणाला, ‘धडाकेबाज खेळी. साहामधील वेगवान धावा काढण्याच्या क्षमतेकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. त्याने चेंडूचा अचूक टप्पा आणि वेग याचा शोध घेत फटकेबाजी केली. त्याच्या खेळीत कुठलीही लप्पेबाजी नव्हती. मी फार आनंद लुटला. शास्त्री यांनी साहा हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक असून फलंदाजीतही तो मागे नसल्याचे काल सिद्ध झाले,’ असे म्हटले आहे.