मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवताना दिमाखात सुरुवात केली. युवा संघांच्या समावेशामुळे दिल्लीकरांच्या खेळामध्ये वेग आणि चपळता दिसून आली. त्याचवेळी, त्यांना मार्गदर्शन करणा-यांमध्येही दिग्ग्गज खेळाडूंचा सहभाग असल्याने दिल्ली संघ रणनिती आखण्यामध्ये वरचढ दिसून आला आहे. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता.
माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असून दिल्लीचा कर्णधार श्रेयसला मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्यावर परस्पर हितसंबंध राखल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता यावर जोरदार प्रत्युत्तर देत गांगुली यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे.
टीकाकारांनी म्हटले होते की, ‘बीसीसीआय अध्यक्ष असताना गांगुली यांनी एका फ्रेंचाईजीच्या कर्णधाराची मदत कशी काय केली?’ या टीकेचा खरपूस समाचार घेताना गांगुली यांनी आपल्या आक्रमक शैलीतून सर्वांची तोंडे गप्प केली. गांगुली म्हणाले की, ‘मी गेल्या वर्षी अय्यरची मदत केली होती. मी नक्कीच बोर्डचा अध्यक्ष असेल, पण एक गोष्ट विसरु नका की, मी भारतासाठी सुमारे ५०० सामने खेळलोय. त्यामुळे मी एका युवा खेळाडूशी नक्कीच बोलू शकतो आणि त्याची मदतही करु शकतो. मग तो श्रेयस अय्यर असो किंवा विराट कोहली. जर त्यांना मदतीची अपेक्षा असेल, तर मी मदत करु शकतो.’
हा सर्व गदारोळ जेव्हा झाला, तेव्हा अय्यरने एक ट्वीट करत यावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला होता. त्याने ट्वीट केले होते की, एक युवा कर्णधार म्हणून मागील सत्रात क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून माझ्या प्रवासातील एक भाग बनण्यासाठी रिकी पाँटिंग आणि दादा यांचे मी आभार मानतो. एक कर्णधार म्हणून त्यांनी व्यैयक्तिक यशामध्ये जी भूमिका बजावली आहे, त्यासाठी मी दोघांचे मनापासून आभार मानत होतो.’
Web Title: IPL 2020: We have played around 500 matches for the country, can talk to anyone; Strong response from ‘Grandpa’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.