IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं? 

IPL 2020 Title sponser : टाटा सन्स यांनी टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उडी घेतल्याने तेच बाजी मारणार असे मानले जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:36 PM2020-08-18T17:36:23+5:302020-08-18T17:37:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: What exactly went wrong with Tata Sons, which is in the pole position in the title sponsorship race? | IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं? 

IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. टाटा सन्स यांनी टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उडी घेतल्याने तेच बाजी मारणार असे मानले जात होते. मंगळवारी अखेरच्या क्षणापर्यंत टाटा सन्सच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा केला जात होता. पण, Dream 11ने बाजी मारली. यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं? 

किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावर उतरणार; थोड्यावेळात ट्वेंटी-20चा थरार सुरू होणार

भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं यंदा संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपवरून माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. 

ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशीप नावावर केली असून अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली.

टाटा सन्सचं नाव का पिछाडीवर गेलं?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्पॉन्सरशिपच्या बदल्यात टाटा सन्सला या कंपनीखाली ३ वेगवेगळे ब्रँड प्रमोट करण्याची परवानगी हवी होती. यासाठी त्यांनी चांगली बोली लावण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. पण नियमानुसार स्पॉन्सर्सना एकाच ब्रँडचं प्रमोशन करता येणार होतं आणि हीच गोष्ट त्यांच्या विरोधात गेली.
 

BREAKING: टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं! 

हार्दिक पांड्याने जाहीर केलं मुलाचं नाव; बघा या फोटोत तुम्हाला सापडतंय का?

 

Web Title: IPL 2020: What exactly went wrong with Tata Sons, which is in the pole position in the title sponsorship race?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.