Join us  

IPL 2020: बोल्ट, कुलकर्णी यांना संघात घेण्यामागे मुंबई इंडियन्सचा 'खास' प्लान!

मुंबई इंडियन्सनं ट्रेंट बोल्ट आणि धवल कुलकर्णी या दोन गोलंदाजांना ट्रेडमधून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:33 PM

Open in App

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील मोसमासाठीच्या संघातून युवराज सिंगला वगळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवी जगभरातील अनेक लीग मध्ये खेळत आहे.  युवीसह मुख्यने एव्हीन लुईस, ॲडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरींदर सरन, बेन कटींग आणि पंकज जैस्वालला करारमुक्त केले. पण, मुंबई इंडियन्सनं ट्रेंट बोल्ट आणि धवल कुलकर्णी या दोन गोलंदाजांना ट्रेडमधून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं, यामागे मुंबई इंडियन्सची एक खास रणनीती असल्याचं संघाचा मेंटर झहीर खाननं सांगितलं. इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) सर्वाधिक चार जेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. बोल्टनं 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2018 व 2019मध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानं 33 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सनं माजी खेळाडू धवल कुलकर्णीला आपल्या संघात दाखल करून घेतले. राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूला घेत मुंबईनं आपली गोलंदाजी अजून मजबूत केली आहे. धवलनं 2008 ते 2013 या कालावधीत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. मुंबईकडून 33 सामन्यांत त्यानं 36 विकेट्स घेतल्या आहेत. एकूण त्यानं 90 आयपीएल सामन्यांत 86 विकेट्स घेतल्या आहेत.  या दोघांना संघानं का घेतलं, याबाबत झहीर म्हणाला,''संघ संतुलित आहेत. सर्व अनुभवी खेळाडू आमच्याकडे आहेत. हार्दिक  पांड्या आणि जसप्रीत बुमराह दुखापतीशी झगडत आहेत. पाडंयावर नुकतीच शस्त्रक्रीया झालीय, बुमराहही पाठदुखीच्या त्रासाचा सामना करत आहे. त्यामुळे पुढील सत्रात आमच्यासमोर अनेक आव्हानं आहेत.  त्यामुळे आम्हाला गोलंदाजी विभागात ताकद वाढवण्याची गरज होती. कोणत्या संघानं कोणाला रिलीज केलंय याचाही अभ्यास सुरू केला आहे. त्यानुसार आयपीएल लिलावात आणखी काही खेळाडू घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'' 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सझहीर खानजसप्रित बुमराहहार्दिक पांड्या