इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीत ( यूएई) दाखल होत आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचे खेळाडू गुरुवारी यूएईत दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघ दुबईत पोहोचले. RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नसल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. अनेकांनी कोहली कुठेय, असा सवालही केला. पण, कोहली दुबईत पोहोचला असून त्यानं स्वतः दुबईतील हॉटेलमधील एक फोटो पोस्ट करून त्याची माहिती दिली. कोहली प्रायव्हेट विमानानं एकटा दुबईत पोहोचला आणि त्यामागचं कारणही त्यानं सांगितलं.
IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन
Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला
बीसीसीआयच्या नियमानुसार आता खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यात तेथे त्यांची कोरोना चाचणी होणार आहे आणि त्यानंतर त्यांना मैदानावर परतण्याची परवानगी मिळणार आहे. खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरच त्याला अन्य खेळाडूंसोबत सरावाची परवानगी मिळणार आहे. यूएईत दाखल होणारा RCB हा सहावा संघ ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद शनिवारी यूएईत दाखल होणार आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा दुबईत होणार असून 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत थरार रंगणार आहे.
त्यावर युजवेंद्र चहलनं घेतली फिरकी. विराटच्या फोटोवर चहलनं कमेंट केली की,''एकाच हॉटेलमधून हॅलो भय्या.''