इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12व्या मोसमात मुंबई इंडियन्सनं दिमाखात जेतेपद पटकावलं. चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का देताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चौथ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावले. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असून मुंबई इंडियन्सलाच प्रबळ दावेदार मानले जात आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही कंबर कसली आहे. पण, आयपीएलच्या 13व्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी पुन्हा एकदा कर्णधार रोहितच्या बॅटिंग पोझिशनची चर्चा सुरू झाली आहे.
सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा
आयपीएल 2020च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीन ( 2 कोटी), नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी), सौरभ तिवारी ( 50 लाख), मोहसीन खान ( 20 लाख), दिग्विजय देशमुख ( 20 लाख) आणि प्रिंस बलवंत राय ( 20 लाख) आदी खेळाडूंना आपल्या ताफ्यात करून घेतले. त्यामुळे रोहित आता पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळेल, की सलामीलाच हा प्रश्न उद्भवला आहे.
एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये
2019मध्ये मुंबई इंडियन्सनं भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला करारबद्ध केलं होतं आणि त्याला मधल्या फळीत जागा मिळावी यासाठी रोहितनं सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं म्हटलं होतं की,''यावर्षी मी आयपीएलमध्ये सलामीला खेळणार. वर्ल्ड कप स्पर्धाही डोळ्यासमोर आहे आणि त्यादृष्टीनं मला आयपीएलमध्ये सलामीला खेळायचे आहे. मधल्या फळीत आमच्याकडे आता अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे मला सलामीला खेळण्याची संधी मिळत आहे.''
यंदाच्या मोसमात ख्रिस लीन आणि क्विंटन डी कॉक हे मुंबई इंडियन्ससाठी सलामीला येण्याची शक्यता आहे आणि रोहित पुन्हा मधल्या फळीत खेळेल.
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना
जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!
इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!
जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!