रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र चहलनं ट्विस्ट आणला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) खेळपट्टीवर असेपर्यंत सामना SRHच्या मुठीत होता, पण युजवेंद्रच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामन्याचे चित्रच बदलले. तीन विकेट्स घेणाऱ्या चहलला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. चहलच्या या कामगिरीवर त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिनं लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. ( Live Score & Updates )
IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा
OMG : KKRच्या फलंदाजाची तुफान फटकेबाजी, कॅमेराची काचच फोडली; MIला धोक्याचा इशारा, Video
Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral
RCBकडून आयच्या सामन्यात IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक्कलनं ( Devdutt Padikkal) दमदार बॅटींग केली. देवदत्तनं ( Padikkal) आरोन फिंच ( Aaron Finch) सारख्या अनुभवी फलंदाजासह RCBला दमदार सुरुवात करून दिली. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याने दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा उभारता आल्या. ( Live Score & Updates )
लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचा कर्णधार व फॉर्मात असलेला फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. ( Live Score & Updates )
तेथे सामना फिरला आणि शिवम दुबे व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर डेल स्टेननं एक विकेट घेत SRHचा डाव 19.4 षटकांत 153 धावांवर गुंडाळला. एकेकाळी 2 बाद 121 अशा मजबूत स्थितित असलेला SRHचा डाव 153 धावांवर गडगडला. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी पाठवले. ( Live Score & Updates )
धनश्रीनं काय पोस्ट लिहिली''हा आपला पहिलाच एकत्रितरित्या सामना आहे. हा खेळ आहे आणि यात काही होऊ शकते, कारण विजयासाठी प्रत्येक खेळाडू अथक परिश्रम घेतो. मात्र, आजच्या सामन्यातील हा माझ्यासाठी खास क्षण आहे. तुला माझा पूर्ण पाठिंबा आहे, Love.''
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 8 ऑगस्टला साखरपुडा केला. चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असे ट्विट केले. त्याच्या या फोटोवर नेटिझन्स आता त्याची फिरकी घेत आहेत. युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.