मुंबई : यंदाचे Indian Premier League (IPL 2020) सत्र चेन्नई सुपरकिंग्जसाठी (ChennaiSuperkings) अत्यंत निराशाजनक ठरले. सीएसके यंदाच्या सत्रातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.
१५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) पुन्हा एकदा मैदानावर पाहता येणार, यासाठी यंदाच्या आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र सीएसके आणि धोनीसाठी यंदाचे सत्र निराशाजनक ठरले. मात्र असे असले, तरी धोनीने युवा खेळाडूंना काही मोलाचे टीप्सही दिल्या आणि सोशल मीडियावर याची खूप चर्चाही झाली. त्यातच धोनीने चमकलेल्या युवा खेळाडूंना आपली ७ क्रमांकाची जर्सी देऊन त्यांचा उत्साहही वाढवला. आता स्वत: धोनीने यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
चेन्नईविरुद्धचा प्रत्येक सामना युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरला. निकाल काहीही लागो, पण या सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून मिळणारे मार्गदर्शन युवांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यात धोनी सामन्यात छाप पाडणाऱ्या युवा खेळाडूंना आपली जर्सी देऊन त्यांचा उत्साह वाढवताना दिसला. सोशल मीडियावरही याची बरीच चर्चा रंगली. आता रविवारी झालेल्या आपल्या अखेरच्या सामन्यानंतर धोनीने टी-शर्ट देण्यामागचे कारण स्पष्ट केले.
सामन्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला विचारले की, ‘तुझ्याकडे काही जर्सी अजून उरले आहेत, हे पाहून चांगले वाटले. कारण अनेकजण तुझ्याकडून जर्सी घेताना दिसले.’ यावर धोनीने सांगितले की, ‘मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांना वाटले की, मी आयपीएलमधूनही निवृत्त होणार आहे. पण असे नाहीए.’ त्याचवेळी धोनीने भोगले यांच्या पुढील सत्रातही तू खेळताना दिसणार का? या प्रश्नावर सांगितले की, ‘नक्कीच, कारण पुढील सत्र केवळ पाच महिने दूर आहे आणि कोणते लॉकडाऊनही नसेल. त्यामुळे संघात कसे आणि काय बदल करावे, यासाठी आम्हाला वेळ मिळेल.’
Web Title: IPL 2020:Every match against Chennai was valuable for the young players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.