Join us  

IPL 2021 CSK news : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव; तीन सदस्यांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, कोटलावरील पाच ग्राऊंड्समन्सनाही लागण

IPL 2021 : 3 From CSK Camp, 5 DDCA Staff Test Positive for Covid-19 After KKR Confirm 2 Cases : इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2021) बायो बबल अखेर कोरोनानं भेदला अन् फ्रँचायझींच्या खेळाडूंसह अनेक सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 3:01 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2021) बायो बबल अखेर कोरोनानं भेदला अन् फ्रँचायझींच्या खेळाडूंसह अनेक सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे ( KKR) वरूण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त सोमवारी सकाळी येऊन धडकले अन् आजचा KKR विरुद्ध रॉयल चॅलंजर्स बँगलोर ( RCB) हा सामना स्थगित करण्यात आला. आता चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त समोर येत आहे. CSKच्या तीन सदस्यांना कोरोना लागण झाली आहे, शिवाय दिल्ली येथील कोटला स्टेडियमवरील  पाच ग्राऊंड्समन्सनाही कोरोना झाल्याचे समोर येत आहे. IPL 2021 : 3 From CSK Camp, 5 DDCA Staff Test Positive for Covid-19 After KKR Confirm 2 Cases

गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल २०२०तही चेन्नईचे दोन खेळाडू ऋतुराज गायकवाड व दीपक चहर यांच्यासह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या धक्क्यातून चेन्नईला सावरणे कठीण झाले आणि त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. आता पुन्हा कोरोनानं त्यांच्या ताफ्यात शिरकाव केला आहे. CSKचे CEO कासी विश्वनाथन, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व बस क्लिनर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ( CSK CEO Kasi Viswanathan, Bowling Coach Balaji and Bus Cleaner has been tested positive for COVID-19) दरम्यान सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ( All players of Chennai Super Kings have tested negative for COVID19.) 

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोटला मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत आणि त्या स्टेडियमवर काम करणाऱ्या पाच ग्राऊंड्समनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. ( 5 groundsmen at Kotla have tested positive for Covid-19) 

चेन्नई सुपर किंग्स ( ७ सामने, ५ विजय, २ पराभव, १० गुण)  Chennai Super Kingsगतवर्षी यूएईत झालेली निराशाजन कामगिरी मागे सोडून चेन्नईचा संघ नव्या ताकदिनं मैदानावर उतरलेला दिसत आहे. ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेलिस या दोन सलामीवीरांची कामगिरी संघाच्या विजयात महत्त्वाची ठरत आहे. RCBचा माजी खेळाडू मोईन अली CSKसाठी मोठं वरदानच घेऊन आला आहे. सुरेश रैना, रवींद्र जडेजा व अंबाती रायुडू हे अनुभवी त्रिकुट संघाला वाचवण्यासाठी खंबीर आहेत. महेंद्रसिगं धोनीची बॅट अद्याप तळपली नसली तरी त्याचे चाणाक्ष नेतृत्व संघासाठी नेहमीप्रमाणे फलदायीच ठरतेय. सॅम कुरन हा CSKला गवसलेला हिरा म्हणावा लागेल. फलंदाजीतही त्याचे योगदान संघाला मिळत आहे. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगिडी यांनी सातत्य राखल्यास संघ अजून मजबूत होईल. ड्वेन ब्राव्हो संघात असून नसल्यासारखा आहे, पण दुसऱ्या टप्प्यात तोच महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.

 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोरोना वायरस बातम्या