इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनसाठीची अंतिम २९२ खेळाडूंची यादी जाहीर केली. आता आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. ( IPL 2021 Player Auction list – 292 cricketers, 61 Spots, 196.6 Cr). चेन्नईत १८ फेब्रुवारीला हा ऑक्शन होणार आहे. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini-Auction) १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती, परंतु ८ फ्रंचायझींनी यापैकी २९२ नावांची अंतिम यादी BCCIकडे सोपवली. IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!
BIG Highlights of Final players list of IPL Auctions- 2 कोटी मुळ किंमत ( 2 crore Base Price ) - केदार जाधव व हरभजन सिंग हे दोनच भारतीय खेळाडू २ कोटींच्या मुळ किंमतीच्या ( base price ) यादीत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings ) रिलीज केलेल्या केदार जाधव ( Kedar Jadhav) याच्यासह हरभजन सिंग, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून डच्चू मिळालेला ग्लेन मॅक्सवेल हे सर्वाधिक मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये आहेत.
- १.५ कोटी ( 1.5 crore Base Price) मुळ किंमतीत १२ खेळाडूंचा समावेश आहे. त्यात हनुमा विहारी आणि उमेश यादव या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. तर १ कोटी मुळ किंमतीच्या यादीत ११ खेळाडू आहेत.
- २९२ खेळाडूंच्या अंतिम यादीत १६४ भारतीय, १२५ विदेशी आणि ३ संलग्न देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.
- महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचा २० लाखांच्या मुळ किंमतीच्या खेळाडूंमध्ये समावेश केला गेला आहे.
- अली खान ( अमेरिका), अंदीप लामिछाने ( नेपाळ) आणि कार्तिक मईयप्पन ( UAE) या तीन संलग्न देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.
- ८ वर्षांच्या बंदीनंतर मैदानावर पुनरागमन करणाऱ्या एस श्रीसंतचा ७५ लाख मुळ किंमतीच्या खेळाडूंमध्ये समावेश होता, परंतु त्याला अंतिम यादीतून वगळले गेले आहे.
- अफगाणिस्तानचा १६ वर्षीय नूर अहमद ( Noor Ahmad) हा यंदाच्या आयपीएलमधील यादीत समावेश झालेला हा युवा खेळाडू आहे. बिग बॅश लीगमध्ये तो मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळला होता.
- नागालँडचा ख्रिएवित्सो केन्से हा सर्वात युवा भारतीय खेळाडू आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं चांगली कामगिरी केली होती आणि मुंबई इंडियन्सनं त्याला ट्रायलसाठी बोलावलं होतं. २० लाखांच्या मुळ किंमतीत त्याचा समावेश आहे.
- ४२ वर्षीय फिरकीपटू नयन दोशी ( Nayan Doshi) हा या लिलावातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. नयन इंग्लंडमध्ये राहतो आणि त्यानं सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचाही २० लाखांच्या मुळ किंमतीतील यादीत समावेश आहे.
- भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांचा मुलगा सादीक किरमानी यानंही नाव नोंदवलं असून ३१ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज २० लाखांच्या मुळ किंमतीतील यादीत आहे.
- RCB कडे ३५.९० कोटी शिल्लक आहेत. त्यानंतर CSK ( २२.९ कोटी), SRH ( १०.१ कोटी), DC ( १२.९० कोटी), KKR ( १०.७५ कोटी ), MI ( १५.३५ कोटी), KXIP ( ५३.२० कोटी), RR ( ३४.८५ कोटी) यांनाही शिल्लक बजेटमध्ये खेळाडू ताफ्यात दाखल करून घ्यायचे आहेत. मुंबई इंडियन्सनं १६ वर्षीय गोलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी; जाणून घ्या त्याची लय भारी कामगिरी
- प्रत्येक संघाला २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण करायची आहे आणि त्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १३), किंग्स इलेव्हन पंजाब ( ९), राजस्थान रॉयल्स ( ८), कोलकाता नाइट रायडर्स ( ८) यांना सर्वाधिक खेळाडू ताफ्यात घ्यायचे आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद ( ३) ला सर्वात कमी खेळाडू घ्यायचे आहेत.