इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी आठही फ्रँचाझींनी तयारीला सुरूवात केली असून चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सरावही सुरू केला आहे. आता आयपीएलच्या सामन्यांसाठी CSK त्यांचा सराव मुंबईत करणार आहेत. भारत-इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकाही २८ मार्चला संपणार आहे आणि त्यानंतर खेळाडू आयपीएलसाठी आपापल्या फ्रँचायझीच्या ताफ्यात दाखल होतील. विराट कोहली ( Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघ IPL 2021चा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध खेळणार आहे. पण, या सामन्यात त्यांना एका खेळाडूशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. जबरा फॅन...!; टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'तो' चक्क टेकडीवर जाऊन बसला अन्...
RCBचा खेळाडू चढणार बोहोल्यावरRCBचा फिरकीपटू व ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज अॅडम झम्पा (Adam Zampa) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे आणि याची माहिती RCBचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी दिली. त्यामुळे झम्पा आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही. RCBनं २४ मार्चला त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करून झम्पाच्या लग्नाची बातमी दिली. RCBचा ट्रेनिंग कॅम्प २९ मार्चपासून सुरू होणार आहे. ''पहिल्या सामन्यात सर्व परदेशी खेळाडू सहभागी होऊ शकत नाहीत. अॅडम झम्पा लग्न करणार आहे आणि त्याच्यासाठी हा आयुष्यातील मोठा क्षण आहे. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या निर्णयाचे स्वागत करतो,'' असे हेसन यांनी सांगितले.
विराट कोहली- देवदत्त पडीक्कल येणार सलामीला
इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहलीनं रोहित शर्मासह सलामीला खेळण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. या दोघांनी मजबूत पाया रचल्यानंतर टीम इंडियाच्या मधल्या फळीनं बिनधास्त खेळ केला. त्यामुळेच विराटनं आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाकडून सलामीला खेळणार असल्याचे जाहीर केले. ( Virat Kohli confirms he will be opening in IPL 2021 for RCB)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction) - ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख