Join us  

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स दुबईत जाण्यासाठी तयार, पण यूएई सरकारकडून परवानगीची प्रतीक्षा!

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१ पर्वातील दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 4:54 PM

Open in App

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१ पर्वातील दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलमधील दोन यशस्वी संघ येत्या शुक्रवारी दुबईत पोहोचण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना अजूही यूएई सरकारकडून परवानगी मिळालेली नाही.  19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडण्यात येणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रत बीसीसीआयनं जाहीर केले आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सर्वात आधी दुबईत दाखल होणार आहेत. ANIने दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स शुक्रवारी दुबईत दाखल होण्यासाठी सज्ज आहे, परंतु त्यांना सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. ( Mumbai Indians is keen to land in Dubai on Friday and is waiting for landing permission.)

'भारतातील लोकं माझा जीव घेतील'; असं का म्हणतेय जेमिमा रॉड्रिग्ज अन् त्याचा MS Dhoniशी काय संबंध?

''चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे आम्हालाही दुबईत दाखल होण्यासाठी यूएई सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे आणि ही परवानगी मिळाल्यास CSK व MI चं विमान शुक्रवारी दुबईत लँड होईल. मुंबई इंडियन्सचे बबल टू बबल ट्रान्सफर असला तरी त्यांना यूएई सरकारच्या नियमानुसार क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू सध्या बायो बबलमध्येच सराव करत आहेत,''असे सूत्रांनी ANIला सांगितले.  घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे मुंबई इंडियन्सचे खेळाडू सराव करत आहेत. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर दोन आठवडे ते तेथे सराव करत आहे. मुंबई इंडियन्स २०२०मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबवे होते, तेच हॉटेल त्यांनी बूक केलं आहे.   

Mumbai Inidian Matches Schedule  : 

19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App