IPL 2021: आयपीएलमध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (RCB) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. चेन्नईनं बंगलोरवर ६ विकेट्सनं दणदणीत विजय प्राप्त केला आणि या विजयासह धोनीचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला. तर कोहलीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर बंगलोरचा कर्णधार विराट कोहली प्रचंड निराश झालेला पाहायला मिळाला. त्यानं सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत सामन्याच्या निकालाची चर्चा केली आणि आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.
"सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्जनं बाहेर बसवण्याची गरज, त्याच्याऐवजी...", मांजरेकर स्पष्टच बोलले!
सामन्यात खरंतर बंगलोरची सुरुवात दमदार झाली होती. कर्णधार विराट कोहली (५३) आणि देवदत्त पडिक्कल (७०) यांनी सलामीसाठी तब्बल १११ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांना उतरती कळा लागली आणि चेन्नईच्या गोलंदाजांना बंगलोरच्या धावसंख्येला लगाम घालण्यात यश आलं. चेन्नईनं आरसीबीला १५६ धावांमध्ये रोखलं.
'माझी पत्नी मला CSK ची जर्सी घालू देईना', RCB फॅन पत्नीची तक्रार घेऊन पती पोहोचला थेट स्टेडियममध्ये!
प्रत्युत्तरात चेन्नईच्या फलंदाजांनी बंगलोरच्या गोलंदाजांचा समाचार घेत १५६ धावांचं आव्हान सहजपणे पूर्ण केलं. सलामीवीर ऋतूराज गायकवाडनं ३८ आणि फॅफ ड्यू प्लेसिसनं ३१ धावा केल्या. मोईन अली यानं १८ चेंडूत २३, अंबाती रायुडूनं ३२ धावांचं योगदान दिलं. तर धोनी ११ धावांवर तर रैना १७ धावांवर नाबाद राहिला.
बॉस...याला म्हणतात 'स्मार्ट फिल्डिंग'! सीमारेषेवर फॅफनं टिपला 'फाडू' झेल; पाहा Video
आरसीबीच्या परभवानंतर कोहलीनं संघातील खेळाडूंशी ड्रेसिंग रुममध्ये संवाद साधला. "आपल्याला आजच्या कामगिरीबाबत खूप वाईट वाटलं पाहिजे. आजची कामगिरी नक्कीच खूप दुखावणारी होती. जेव्हा आपण गुणतालिकेत वरच्या स्थानावर असतो आणि आपण खेळ उत्तम प्रकार संपवण्याबाबत बोलतो तेव्हा अशापद्धतीची कामगिरी करणं अजिबात अपेक्षित नसतं", असं कोहली स्पष्टपणे म्हणाला. कोहली बोलत असताना ड्रेसिंग रुममधलं वातावरण अतिशय शांत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.
"खेळपट्टी थोडी मंदावली होती. तरीही मला वाटतं की आणखी १५-२० धावा व्हायला हव्या होत्या. आपण १७५ धावा केल्या असत्या तर आपली जिंकण्याची संधी होती. त्यात आपण गोलंदाजीतही सातत्य राखलं नाही. मी खूप निराश झालो. यापुढे अशी कामगिरी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे", असंही कोहली म्हणाला.
Web Title: IPL 2021 After the defeat against Chennai virat Kohli in dressing room watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.