१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्पर्धा कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. देशातील कोरोना परिस्थिती बिकट होत असताना आयपीएल का खेळवली जातेय, असा प्रश्नही अनेकांनी विचारला होता. पण, बीसीसीआयनं खेळाडूंसाठी सुरक्षित बायो बबल तयार करून २९ सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन केलं, परंतु एकामागून एक खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहमदाबाद येथील या व्हिडीओत आयपीएलमधील खेळाडूंचा ताफा जाण्यासाठी रुग्णवाहिकेला अडवल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकांचा संताप उडावेला पाहायला मिळत आहे. ( ambulance being stopped for IPL convoy to pass in Ahmedabad ) फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना यांच्यावरही कोरोना संकट?; CSKच्या गोटातून समोर आली धक्कादायक बाब!
मुंबई आणि बंगळुरूचा टप्पा झाल्यानंतर संघ दिल्ली व अहमदाबाद येथील सामन्यांसाठी त्या त्या ठिकाणी दाखल झाले. या दिल्ली व अहमदाबाद येथील कोरोना परिस्थिती अधिक बिकट होती. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा अन् चेन्नई सुपर किंग्समधील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात मंगळवारी CSKचा फलंदाज प्रशिक्षक मायकल हसी ( Michael Hussey) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. Fact Check : महेंद्रसिंग धोनीनं IPL २०२१मधून मिळणारा १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यासाठी केला दान!
या निर्णयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कोलकाता नाईट रायडर्सचा ताफा जाण्यासाठी रुग्णवाहिकेला अडवल्याचे पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ..