IPL 2021: अरे बापरे! तणावमुक्तीसाठी आंद्रे रसेलनं सुचवला भन्नाट उपाय, नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण

IPL 2021: आयपीएलचं यंदाचं १४ वं सीझन सुरू असून प्रत्येक सामन्यात क्रिकेट रसिकांना रोमांच पाहायला मिळतो आहे. आयपीएलचं यंदाचं सीझन आता लवकरच मध्यापर्यंत पोहोचेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:27 PM2021-04-28T17:27:36+5:302021-04-28T17:30:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Andre Russell cryptic IG story with alcohol bottle hints distress due to rough patch in the season | IPL 2021: अरे बापरे! तणावमुक्तीसाठी आंद्रे रसेलनं सुचवला भन्नाट उपाय, नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण

IPL 2021: अरे बापरे! तणावमुक्तीसाठी आंद्रे रसेलनं सुचवला भन्नाट उपाय, नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: आयपीएलचं यंदाचं १४ वं सीझन सुरू असून प्रत्येक सामन्यात क्रिकेट रसिकांना रोमांच पाहायला मिळतो आहे. आयपीएलचं यंदाचं सीझन आता लवकरच मध्यापर्यंत पोहोचेल. यंदा काही संघ दमदार कामगिरी करताना दिसतायत. तर काही संघांकडून सातत्यानं निराशाजनक कामगिरी पाहायला मिळतेय. यातलाच एक संघ म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स (KKR) अन् त्यात या संघाचा अष्टपैलू आंद्र रसेल सध्या खूप वाईट काळातून जातोय असंच म्हणावं लागेल. कारण त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळत नाहीय. (IPL 2021 Andre Russell cryptic IG story with alcohol bottle hints distress due to rough patch in the season)

IPL 2021: रवी शास्त्री म्हणाले चित्र स्पष्ट आहे...; यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाबाबत केली मोठी भविष्यवाणी!

आंद्र रसेल देखील त्याच्या निराशाजनक कामगिरीवर खूपच नाराज झालेला दिसतोय. त्यानं नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी अपलोड केली असून या स्टोरीची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज खेळाडूनं मद्याच्या बाटलीसोबत त्याचा एक फोटो इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. सध्याच्या वाईट काळात मद्याची ही बाटलीच काय ती सोबती आहे आणि तणावमुक्तीसाठी हाच उपाय सध्यातरी दिसतोय अशा आशयातून रसेल यानं ही इन्स्टास्टोरी पोस्ट केली आहे. तणावातून बाहेर पडण्यासाठी याचीच मदत होते, असंही त्यानं म्हटलं आहे. 

सोशल मीडियात रसेलच्या या स्टोरीची जोरदार चर्चा सुरू आहे. केकेआरच्या यंदाच्या सीझनमधील कामगिरीबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. केकेआरचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. आंद्रे रसेलच्या वैयक्तिक खेळीवर नजर टाकली तर गेल्या सहा सामन्यांमध्ये रसेलला अवघ्या १९.६६ च्या सरासरीनं केवळ ११८ धावा करता आल्या आहेत. 

IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!

याशिवाय, रसेलच्या कामगिरीबाबत अनेक माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांनीही भाष्य केलं आहे. काहींनी आंद्रे रसेल याच्या संघातील फलंदाजी क्रमवारीबाबत आक्षेप घेतला आहे. रसेल याला आणखी वर फलंदाजीसाठी पाठवण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. 
 

Web Title: IPL 2021 Andre Russell cryptic IG story with alcohol bottle hints distress due to rough patch in the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.