इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यातील सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून उर्वरित ३१ सामन्यांच्या दुसऱ्या टप्पा सुरू होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या लढतीनं हा टप्पा सुरू होणार आहे. कोरोनामुळे मध्येच स्थगित करावा लागलेले हे १४ वे पर्व जवळपास ६ महिन्यांनी पुन्हा होणार असल्यानं चाहतेही उत्सुक आहेत. त्यामुळे आयपीएलनं त्यासाठी एक प्रोमो व्हिडीओ तयार केला आहे आणि त्यात महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
IPL Cheerleaders Salaries :मुंबई इंडियन्स अन् KKR चीअर लीडर्सना द्यायचे सर्वाधिक पगार; मॅच जिंकल्यावर मिळायचा 6500 रुपयांचा बोनस!
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या व्हिडीओत फंकी लूकमध्ये दिसत आहे. पिवळी केसं, गुलाबी रंगाचा जॅकेट अन् त्यावर सोनेरी रंगाचे तारे... धोनीच्या या लूकनं सर्वांना वेड लावले आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू दुबईत दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.
Full Schedule19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून20 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून21 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून24 सप्टेंबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून25 सप्टेंबर - सनयारझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून30 सप्टेंबर - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून1 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चँलेंजर्स बँगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून3 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून6 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून7 ऑक्टोबर - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून7 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून10 ऑक्टोबर - क्वालिफायर, सायं. 7.30 वाजल्यापासून11 ऑक्टोबर - एलिमिनेटर, सायं. 7.30 वाजल्यापासून13 ऑक्टोबर - क्वालिफायर 2, सायं. 7.30 वाजल्यापासून15 ऑक्टोबर- फायनल, सायं. 7.30 वाजल्यापासून