Join us  

IPL 2021: 'असं केलं तर कुणीही कॅप्टन होईल'; KKR च्या 'कोड मेसेज'वर सेहवाग भडकला!, नेमका प्रकार काय?

IPL 2021: आयपीएलमध्ये सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Kolkata knight Riders vs Punjab Kings) यांच्यात सामना झाला. कोलकाता नाइट रायडर्स संघानं सामना ५ विकेट्सनं जिंकला. पण या सामन्यात एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 4:25 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Kolkata knight Riders vs Punjab Kings) यांच्यात सामना झाला. कोलकाता नाइट रायडर्स संघानं सामना ५ विकेट्सनं जिंकला. पण या सामन्यात एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

IPL 2021: शिवम मावीचे शब्द ऐकून 'लाइव्ह शो'मध्ये रडू लागला द.आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन!

कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर केला गेला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा खुलेआम कोडवर्ड्सचा वापर आणि ते ही डगआऊटमधून हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. कोलकाताच्या या खेळीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं जोरदार टीका केली आहे. क्रिकेट सामन्यात डगआऊटमधून जर असे कोड मेसेजेस पाठवले जाणार असतील तर मैदानातील कोणताही खेळाडू कर्णधार होऊ शकतो, अशी टीका सेहवागनं केली आहे. (IPL 2021 Anyone can be the captain in this way Virender Sehwag criticizes KKR's code word strategy)

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन यांची रोखठोक भूमिका

"आपण अशाप्रकारचे कोड मेसेजेस लष्करातील जवानांसाठी असतात हे पाहिलं किंवा ऐकलं आहे. केकेआरनं डगआऊटमधून केलेला ५४ हा इशारा मला वाटतं एका गोलंदाजाला ठराविक वेळेला गोलंदाजी देण्यासाठी केलेला असावा जेणेकरुन मैदानात कर्णधार इऑन मॉर्गन याला थोडी मदत मिळू शकेल. पण जर सामना मैदानाबाहेरूनच नियंत्रित केला जाणार असेल तर मैदानात कोणताही खेळाडू कर्णधार होऊ शकतो. कर्णधाराची कोणतीच भूमिका शिल्लक राहत नाही. इऑन मार्गनकडेही एक प्रचंड क्षमता आहे. तो वर्ल्डकप विजेता कर्णधार आहे", असं वीरेंद्र सेहवाग यानं म्हटलं आहे. 

नेमकं काय घडलं होतं?कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाब किंग्ज संघाने 9.4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 47 धावा केल्या. डावाची दहावी ओव्हर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा टाकत होता आणि क्रीजवर पंजाबचा फलंदाज मोइसेस हेनरिकेज बॅटिंग करत होता. कोलकाताच्या डगआऊटमधून कोडवर्ड्सच्या माध्यमातून इशारे गेले गेले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डगआऊटमधून 54 क्रमांकाचा आकडा दाखवण्यात येत होता. यामागचं नेमकं कारण काही कळू शकलेलं नाही. सामन्याचे समालोचक आणि माजी क्रिकेटपटू या कोडवर्डचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पाहा व्हिडिओ:

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सविरेंद्र सेहवाग