लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयपीएलमध्ये सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या संघांमध्ये पाचवेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ आघाडीवर आहे. विशेष म्हणजे या संघातील माजी खेळाडूंची क्रेझही अद्याप कायम असल्याचे दिसून आले. असा एक मुंबई इंडियन्सकडून याआधी खेळलेला, मात्र यंदा आयपीएलमध्ये नसलेल्या वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूशी बातचीत केले. यावेळी एकाने थेट मुंबई इंडियन्स संघावर टीका केली, तर त्या वेगवान गोलंदाजाने सडेतोड उत्तर देत त्या युझरचे तोंड बंद केले. हा वेगवान गोलंदाज होता मिशेल मॅक्लेनघन. IPL 2021 : रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर पोस्ट केला नवा फोटो, जाणून घ्या कोण आहे इशा नेगी
मॅक्लेनघन यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याच संघाचा सदस्य नाही. त्याला गेल्यावेळी मुंबईनेच रिलिज केले होते. मुंबईकडून ५६ आयपीएल सामने खेळताना मॅक्लेनघनने ७१ बळी घेतले आहेत. मात्र, यानंतरही तो संघातील स्थान टिकवू शकला नाही. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या निमित्ताने त्याने ट्वीटरवर चाहत्यांशी संवाद साधताना ‘क्यू अॅण्ड ए’ सेशन घेतले. यावेळी काही टारगट चाहत्यांनी मॅक्लेनघनला छेडले, पण त्यांची ही मस्ती त्यांच्यावरच उलटली. IPL 2021 : रोहित शर्मावर भडकला जडेजा; ...वीरेंद्र सेहवागला ओपनिंगला पाठवले नसते का?, विचारला प्रश्न
सध्या मुंबईने चार सामने खेळताना दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. गुणतालिकेतही मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी विराजमान आहे. मॅक्लेनघनसोबत प्रश्नोत्तराचा खेळ सुरु असताना एका युझरने म्हटले की, ‘यावेळी मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिल.’ यावर मॅक्लेनघन म्हणाला, ‘तू वेडा आहेस का?’ तर लगेच दुसºयाने ट्वीट केले की, ‘सत्य नेहमी बोचते.’ यावर मॅक्लेनघनने ट्वीट केले की, ‘जर खरंच असे झाले, तर मी माझ्या प्रत्येक क्रिकेट साहित्याचे सामाजिक निधी संकलनासाठी लिलाव करेन.’ Sachin Tendulkar: "मी प्लाझ्मा देणार आहे, तुम्हीही दान करा"; वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरचा संकल्प अन् साद
यानंतर मात्र, पुन्हा मुंबई इंडियन्सवर कोणाकडूनही प्रश्न आला नाही. तसेच, आयपीएलमध्ये खेळत नसतानाही मुंबई इंडियन्स संघाप्रती मॅक्लेनघनची असलेली भावनाही यावेळी दिसून आली.
Web Title: IPL 2021: “Are You Dumb?” – Mitchell McClenaghan Trolls Twitter User Who Said Mumbai Indians Will Finish At Bottom
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.