इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी गुरूवारी (१४ फेब्रुवारी) ऑक्शन ( IPL 2021 Auction) होणार आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) यानंही लिलावासाठी नाव नोंदवल्यानं त्याला कोणती फ्रँचायझी घेते, याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यात लिलावापूर्वी अर्जुननंही अष्टपैलू कामगिरी करून फ्रँचायझींचे लक्ष वेधले आहे. लिलावाच्या आदल्या दिवशी अर्जुन तेंडुलकर आयपीएलमधील एका टीमच्या जर्सीत जिममध्ये सराव करताना दिसला आणि त्यामुळे तो याच संघाकडून खेळणार, अशा चर्चांनी वातावरण तापले आहे. अर्जुननं इस्टाग्रावर पोस्ट केलेल्या फोटोत तो मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) जर्सीत दिसत आहे. त्यामुळे उद्या मुंबई इंडियन्स अर्जुनला कोणत्याही किंमतीत आपल्या ताफ्यात घेणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. IPL 2021: मोठी बातमी! किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं नावात केला बदल, लोगोही बदलला
लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम २९२ खेळाडूंच्या यादीत अर्जुनला २० लाख बेस प्राईज असलेल्या खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण केले आणि त्यामुळे तो आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला. अर्जुनची अष्टपैलू कामगिरीमुंबईत सुरू असलेल्या पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत ( Police Shield Cricket Tournament ) अर्जुन एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमआयजी संघानं मोठा विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यात अर्जुननं २६ चेंडूंत ७७ धावा चोपल्या आणि त्यात ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता. २१ वर्षीय अर्जुननं गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४० धावा देत ३ विकेट्सही घेतल्या. IPL 2021 Auctions: फ्रँचायझींना 'या' रहस्यमयी गोलंदाजानं घातलीय भुरळ; फिरकीपटूंसाठी ओतला बक्कळ पैसा!
४५-४५ षटकांच्या या सामन्यात एमआयजी क्लबनं इस्लाम जिमखान्यावर विजय मिळवला. नाणेफेक जिंकून एमआयजी क्लबने प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. कर्णधार केव्हीन डी'अल्मेडानं ९३ चेंडूंत ९६ धावा चोपल्या, तर प्रग्नेश कानपिल्लेवर यानं खणखणीत शतक झळकावलं. अर्जुननं स्फोटक फलंदाजी करताना संघाला ४५ षटकांत ७ बाद ३८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात इस्लाम जिमखाना संघाला ४१.४ षटकांत सर्वबाद १९१ धावा करता आल्या. IPL Auction 2021मध्ये या १३ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींमध्ये रंगणार जबरदस्त चुरस!