IPL 2021: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन यांची रोखठोक भूमिका

IPL 2021: आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मायदेशात परतण्यासाठी व्यवस्था त्यांनी स्वत:च करावी, असे स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:20 PM2021-04-27T15:20:02+5:302021-04-27T15:27:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Australian cricketers in India will have to make own arrangements for return says Australia PM | IPL 2021: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन यांची रोखठोक भूमिका

IPL 2021: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन यांची रोखठोक भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मायदेशात परतण्यासाठी व्यवस्था त्यांनी स्वत:च करावी, असे स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियानं भारतातून येणाऱ्या विमान प्रवासाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

मोदी बेजबाबदार! IPL थांबवा अन् कोरोनाकडे लक्ष द्या, ब्रिटनच्या पत्रकाराची रोखठोक टीका

भारतात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिवसागणिक तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना बंदी घातली आहे. भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरू आहे आणि यात अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचेही अनेक क्रिकेटपटू, समालोचक आणि प्रशिक्षकांचा यात समावेश आहे. त्यामुळे भारतातून मायदेशात परतण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं व्यवस्था करावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून करण्यात आली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मागणी थेट फेटाळून लावली आहे. 

IPL 2021: भारतात कोरोनाचा विस्फोट! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी घेतला महत्वाचा निर्णय

"भारतात आयपीएलसाठी गेलेले खेळाडू हे खासगी प्रवासानं गेले आहेत. ते देशाचा अधिकृत दौऱ्यावर गेलेले नाहीत. ते स्वत:च्या खासगी फ्रँचायझीच्या संसाधनांचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च त्यांची मायदेशात परतण्यासाठीची व्यवस्था करावी", असं स्पष्ट मत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्यक्त केलं आहे. 

IPL 2021: ३७ चेंडूत ठोकलेलं शतक, विराट कोहली या विस्फोटक फलंदाजाला का खेळवत नाही?

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू अँड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांनी भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर आयपीएलमध्ये अजूनही ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू खेळत आहेत. यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅच कमिन्स यांच्यासह प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सायमन कॅटिच यांचा समावेश आहे. याशिवाय समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल सॉल्टर आणि लिसा स्थेलकर देखील आयपीएलमध्ये समालोचन पथकाचे सदस्य आहेत. 

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिन यानं ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडे खेळाडूंसाठी चार्टड प्लेनची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. त्यावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
 

Web Title: IPL 2021 Australian cricketers in India will have to make own arrangements for return says Australia PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.