भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज किमान साडेतीन लाख नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना गुदमरून मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2021) काही खेळाडूंनी माघार घेतली आहे. अॅडम झम्पा व केन रिचर्डसन हे व्हाया व्हाया प्रवास करून गुरुवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाले. अँड्य्रू टाय व लायम लिव्हिंगस्टोन यांनीही बायो बबलला कंटाळून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. पण, ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि स्पर्धा संपल्यानंतर ते मायदेशात परणात आहेत. मात्र, त्यांना पाच वर्षांची जेल किंवा ५० लाखांचा दंड भरावा लागू शकतो. IPL 2021 : Australian returning from India could now face a 5-year jail term :
पुढील ४८ तासांत नवा कायदा लागूभारतात अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मायदेशात जाण्याची ओढ लागली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारनं १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता ऑस्ट्रेलिया सरकार नवा कायदा आणू पाहत आहे. नव्या फौजदारी गुन्हा कायद्यानुसार ( new criminal offence laws ) भारतातून येणाऱ्या व्यक्तिला पाच वर्षांची जेल किंवा ६६,००० डॉलर ( जवळपास ५० लाख) दंड भरावा लागणार आहे. या कायदा येत्या ४८ तासांत लागू केला जाईल, असे वृत्त काही ऑस्ट्रेलियन मीडियांनी प्रसिद्ध केले आहे.
९ न्यूज ऑस्ट्रेलियाचे पत्रकार ख्रिस उल्हामन यांनी ही माहिती दिली आहे. Biosecurity Act अंतर्गत या नवा कायदा शनिवारी मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑस्ट्रेलियानं भारतातून येणाऱ्या थेट विमानसेवा तीन आठवड्यांसाठी रद्द केल्या आहेत.
आयपीएलमधील खेळाडूंचं काय होणार?नव्या कायद्याचा फटका ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही बसू शकतो. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, आदी अनेक ऑसी खेळाडू आयपीएलमध्ये सध्या खेळत आहेत. या नव्या कायद्याचा त्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. पण, जो पर्यंत सर्व खेळाडू त्यांच्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत आयपीएल २०२१ आमच्यासाठी संपणार नाही, असं आश्वासन बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना दिलं आहे. त्यामुळे झम्पा व रिचर्डसन यांच्या माघारीनंतर बीसीसीआयनं दिलेल्या आश्वासनामुळे काही ऑसी खेळाडूंनी स्पर्धा पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्यासमोर हे नवं संकट आलं आहे.
छुपा मार्गही बंद, झम्पा-रिचर्डसन थोडक्यात वाचले...भारतातून थेट विमानसेवा बंद असली तरी दोहा किंवा अन्य मार्गे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या विमानसेवा सुरू होत्या. त्यामुळे काही जणं व्हाया व्हाया मार्गे ऑस्ट्रेलियात पोहोचत होते. पण, आता तोही मार्ग बंद केला आहे. झम्पा व रिचर्डसन यांनाही या नियमाचा फटका बसला असता परंतु सायंकाळी ७ वाजल्यापासून हा नियम लागू झाला आणि ही दोघं खेळाडू त्याआधी ऑस्ट्रेलियात दाखल झाली.