Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी कोरोनाग्रस्त खेळाडू व सदस्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. कोरोना परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या आयपीएलचे सामने मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता व नवी दिल्ली या सहा शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या दहा सामन्यांसाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings), दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals), राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals), पंजाब किंग्स ( Punjab Kings), कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघ दाखल झाले आहेत. पण, KKR चा नितीश राणा ( Nitish Rana), वानखेडे स्टेडियमचे ८ कर्मचारी आणि DC चा अष्टपैलू अक्षर पटेल ( Axar Patel) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं सर्व फ्रँचायझींची चिंता वाढली आहे. अक्षर पटेलच्या प्रकृतीबाबत DCनं अधिकृत माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. Big News : मुंबईतील IPL 2021चे सामने हैदराबाद किंवा इंदूरला होणार; BCCIनं दिले स्पष्ट संकेत
''दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो २८ मार्चला मुंबईत दाखल झाला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तो आयसोलेशनमध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सची वैद्यकीय टीमही त्याच्या संपर्कात आहे. तो लवकर बरा होईल,यासाठी त्याला शुभेच्छा देतो,''असे दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत आली मोठी बातमी, बालपणीच्या मित्रानं दिली महत्त्वाची माहिती
अक्षर पटेलचं कसोटीत विक्रमी पदार्पणइंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून अक्षरनं पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात ( २-४० व ५-६०) सात विकेट्स घेत इतिहास रचला. तीन सामन्यांत त्यानं २७ विकेट्स घेत सर्वांना थक्क केलं.