Join us  

T20 World Cup,  BAN v OMN : बांगलादेशनं स्पर्धेतील आव्हान जीवंत राखले, लढाऊ बाणा दाखवणाऱ्या ओमानला नमवले

Bangladesh beating Oman by 26 runs बांगलादेशनं १५३ धावांचा आव्हानात्मक पल्ला उभा करण्यात यश मिळवलं. ओमानच्या फलंदाजांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचा अनुभव कमी पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:34 PM

Open in App

T20 world Cup, OMAN V BANGLADESH : स्कॉटलंडकडून हार मानावी लागल्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. ओमान संघानंही त्यांची हालत खराब केली. मोहम्मद नईम व शाकिब अल हसन खेळपट्टीवर असेपर्यंत सारेकाही बांगलादेशच्या बाजूनं होतं. पण ओमानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना जबरदस्त पुनरागमन केलं. पण, बांगलादेशनं १५३ धावांचा आव्हानात्मक पल्ला उभा करण्यात यश मिळवलं. ओमानच्या फलंदाजांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचा अनुभव कमी पडला अन् बांगलादेशनं हा सामना जिंकला. या विजयासह बांगलादेशनं स्पर्धेतील आव्हानही टीकवले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचे दोन फलंदाज २१ धावांवर माघारी परतले होते. लिटन दास ( ६) व मेहदी हसन ( ०) यांना अनुक्रमे बिलाल खान व फय्याज बट यांनी बाद केले. बटनं स्वतःच्याच गोलंदाजीवर हसनचा अफलातून झेल टिपला. पण, नईम व शाकिब यांनी बांगलादेशच्या डावाला आकार देताना तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. शाकिबनं २९ चेंडूंत ६ चौकारांसह ४२ धावा केल्य. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात आकिब इलियासनं बांगलादेशच्या अष्टपैलूला धावबाद केले. 

त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी लाईनच लावली. बिबाल खान, फय्याज बट व कलीमुल्लाह यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना बांगलादेशच्या ८ फलंदाजांना ५२ धावांत माघारी पाठवले. नईम ५० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर माघारी परतला. बांगलादेशचा डाव २ बाद १०१ धावांवरून १५३ धावांवर गडगडला. बांगलादेशनं ओमानसमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ( Oman needs 154 runs to knock Bangladesh out of the T20 World Cup 2021.)  बिलालनं १८ धावांत ३, फय्याजनं ३० धावांत ३ आणि कलीमुल्लाहनं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरात दुसऱ्याच षटकात मुस्ताफिजूर रहमाननं ओमानचा सलामीवीर अकिब इलियास ( ६) याची विकेट काढली. मुळचा भारतीय पण ओमानकडून खेळणाऱ्या जतिंदर सिंग व कश्यप प्रजापती यांनी  बांगलादेशला सडेतोड उत्तर दिले. मुस्ताफिजूरनंची ही जोडी  तोडली. प्रजापती १८ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २१ धावा केल्या. कर्णधार झीशान मक्सूनदं मारलेला षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारा होता, परंतु महेदी हसननं ओमानला तिसऱा धक्का दिला. शाकिबनं १३व्या षटकात  सामन्याला कलाटणी दिली. ओमानसाठी खिंड लढवणाऱ्या जतिंदर  ( ४० ) याला त्यानं बाद केले. आता सामना ओमानच्या हातून निसटू लागला होता.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. शाकिबनं पुढील षटकात सलग दोन धक्के दिले.९० धावांवर ओमानची चौथी विकेट पडली अन् बघता बघता २२ धावांत ५ खेळाडू माघारी परतले. ओमानला ९ बाद १२७ धावाच करता आल्या आणि बांगलादेशनं २६ धावांनी सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान जीवंत राखले आहे. असे असले तरी बांगलादेशला अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागेच आणि शिवाय ओमान ( वि. स्कॉटलंड) च्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. बांगलादेशला पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडनं पराभूत केले आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बांगलादेश
Open in App