Join us  

IPL 2021 : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान,'उर्वरित आयपीएल भारतात होणार नाही!'; जाणून घ्या चार पर्याय!

IPL 2021 Remaining Season- कोरोनानं बायो-बबल भेदले अन् एकामागून एक खेळाडू पॉझिटिव्ह सापडल्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. आ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:43 AM

Open in App

IPL 2021 Remaining Season- कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीसीसीआयवर आयपीएल रद्द करण्याचं दडपण वाढत होते. त्याचवेळी कोरोनानं बायो-बबल भेदले अन् एकामागून एक खेळाडू पॉझिटिव्ह सापडल्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर महिन्याच्या विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा आता भारतात होणार नाही, हे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांनी स्पष्ट केले. देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्यानं ही स्पर्धा भारतात होणार नसल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलं.  

तो म्हणाला,''भारतीय  संघ तीन वन डे व पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे 14 दिवसांचा क्वारंटाईनची समस्या असेल. आयपीएल 2021चा दुसरा टप्पा भारतात होणार नाही. क्वारंटाईन कालावधीचे नियोजन करणे आव्हानात्मक आहे. आयपीएलसाठी नेमकी कोणती विंडो मिळेल, याबाबत घोषणा करणे, खूप घाईचं ठरेल.'' टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्यासाठी चार पर्याय   

आयपीएल 2021च्या उर्वरित 31 सामने आयोजित करण्यासाठी चार देशांचे प्रस्ताव समोर आले आहेत. इंग्लंड, यूएई, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उत्सुकता दर्शवली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि बीसीसीआय याबाबतच निर्णय लवकर घेतील.''आम्ही अन्य बोर्डांशी चर्चा करत आहोत आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विंडो उपलब्ध होतेय का, हे पाहावे लागेल,''असे गांगुलीनं सांगितले. आयपीएल स्पर्धा पूर्ण न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींचं नुकसान होण्याचा अंदाज गांगुलीनं व्यक्त केला. 

पर्याय 1 - यूएई -  आयपीएल 2020चे यूएईत यशस्वी आयोजन केल्यानंतर आयपीएल 2021साठीही हाच पर्यात सर्वात प्रथम समोर आला होता, परंतु बीसीसीआयनं त्याकडे दुर्लक्ष करून भारतात 14वे पर्व खेळवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी पुन्हा यूएईचा पर्याय समोर येत आहे.

पर्याय 2 - इंग्लंड - भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह हेही इंग्लंडला जाणार आहेत. त्यावेळी ते तेथील कौंटी क्लबसोबत आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी चर्चा करण्याचे वृत्त आहे. अनेक कौंटी क्लब्सनी तसा प्रस्तावही बीसीसीआयसमोर ठेवला आहे.

पर्याय 3 - श्रीलंका -  श्रीलंका क्रिकेटनेही बीसीसीआयच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. 2020तही श्रीलंकेनं आयपीएल आयोजनाची तयारी दर्शवली होती. डेक्कन क्रोनिकल सोबत बोलताना श्रीलंका क्रिकेटच्या व्यवस्थापकिय मंडळाचे प्रमुख प्रो. अर्जुन डी सिल्व्हा यांनी सांगितले की,लंका प्रीमिअर लीगसाठी आम्ही ग्राऊंड्स व अन्य सुविधा तयार केल्या आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये लंका प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही तयार आहोत. यूएईचा पर्यायही बीसीसीआयसमोर आहे, परंतु श्रीलंकेला कोणत्याच कारणामुळे दुर्लक्षित करता कामा नये.'' 

पर्याय 4 - ऑस्ट्रेलिया - बीसीसीआयनं ऑस्ट्रेलियन सरकारशी चर्चा करून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करू शकतं.  

टॅग्स :आयपीएल २०२१सौरभ गांगुलीबीसीसीआयसंयुक्त अरब अमिरातीआॅस्ट्रेलियाइंग्लंडश्रीलंका