मुंबई : भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना आता त्याचे पडसाद सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेवरही दिसू लागले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीपासून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केल्याचे पाहण्यास मिळाले. देवदत्त पडिक्कल, अक्षर पटेल यांच्यासह अनेक मैदान कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात करत पुनरागमन केले. परंतु, आता कोरोनामुळे काही आघाडीच्या खेळाडूंनी माघार घेतली आहे. कुटुंबियांना कोरोना झाल्याने रविचंद्रन अश्विनने माघार घेतली, तर भारतातील परिस्थिती पाहून अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्रयू टाय या ऑस्ट्रेलियन्सनी माघार घेतली आहे. पण असे असले, तरी आयपीएलमध्ये मात्र खंड पडणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खुद्द बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. (IPL 2021: BCCI says IPL will continue for now as Ashwin 3 Australians withdraw)
सॅल्यूट! १९ वर्षीय खेळाडूनं कोरोना लसीकरणासाठी खर्च केली करिअरची सर्व कमाई
रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने ट्वीट केले की, ‘मी यंदाच्या आयपीएल सत्रातून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोना महामारीविरुद्ध लढत आहे आणि या कठीण प्रसंगी त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. जर परिस्थिती योग्य दिशेने वाटचाल करत राहिली, तर मी पुनरागमन करेन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स.’ त्याचप्रमाणे, राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अँड्रयू टाय यानेही कोरोनाची भारतातील परिस्थिती पाहून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही, तर त्याने असाही दावा केला आहे की, भविष्यात आणखी ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी परततील. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणारे केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांनीही वैयक्तिक कारण देत आयपीएलमधून माघार घेतली. आयपीएलचे सध्याचे सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येत असून खेळाडूंना बायो बबलमध्ये रहावे लागत आहे.
IPL 2021: कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला
अशा परिस्थितीमध्ये अनेकांनी आयपीएल तात्पुरता रद्द करण्यात यावी अशीही मागणी केली. मात्र अशी सुतराम शक्यता नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयपीएल सुरु राहणार असल्याची माहिती दिली. या अधिकाऱ्याने माहिती दिली की, ‘आयपीएल सुरु राहणार आहे. जर कोणता खेळाडू स्पर्धा अर्ध्यावर सोडणार असेल, तर त्यात काहीच अडचण नाही.’ शिवाय आरसीबीनेही ट्वीटरद्वारे माहिती दिली की, ‘वैयक्तिक कारणामुळे अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन मायदेशी परतत असून बाकीच्या सामन्यांसाठी ते उपलब्ध नसतील. आरसीबी पूर्णपणे त्यांच्यासोबत असून त्यांना शक्य तेवढी सर्व मदत करेल.’
Web Title: ipl 2021 BCCI says IPL will continue for now as Ashwin 3 Australians withdraw
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.