Join us  

IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार?

IPL 2021: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आयपीएल सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली जात आहे. त्यात आता आयपीएल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देखील दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 10:38 AM

Open in App

IPL 2021: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आयपीएल सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली जात आहे. त्यात आता आयपीएल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देखील दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सर्व समाविष्ट खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतर संबंधित मंडळी बायो-बबलचा भाग असतानाही कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत एकच गहजब उडाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल संदर्भात लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

IPL 2021: कोरोना वाढतोय, आयपीएल थांबवा; दिल्ली हायकोर्टात याचिका, BCCI समोर पेच!

आयपीएल स्पर्धा सुरूच राहणार अशी ठाम भूमिका बीसीसीआयनं घेतली आहे. त्यास सर्व फ्रँचायझिंनीही पाठिंबा दिला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आता बीसीसीआयनं उर्वरित सर्व सामने मुंबईत खेळविण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडियमवर आयपीएलचे उर्वरित सर्व सामने हलवले जाण्याची दाट शक्यता आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांचे पुढील दोन दिवसाचे सामनेही होऊ शकतात स्थगित; समोर आलं मोठं कारण

आयपीएलचे सामने सध्या मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई अशा चार ठिकाणी नियोजित करण्यात आले आहेत. पण संघांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातानाच कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक असल्याचं व्यवस्थापनाच्या लक्षात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर संघांना मोठा प्रवास करावा लागू नये यासाठी सर्व संघांची एकाच शहरात व्यवस्था करुन सामने एकाच ठिकाणी खेळविण्यात आले तर धोका कमी होईल असा बीसीसीआयचा मानस आहे. यात मुंबईपेक्षा उत्तम पर्याय बीसीसीआयसमोर दिसत नाही. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडियममधील अंतर अगदी कमी आहे. त्यात मुंबईत सर्व संघांची व्यवस्था होऊ शकेल असे हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत हलविण्याचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकतं. 

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघंही संघाच्या बायो-बबलमध्ये असतानाही कोरोनाची लागण झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. उर्वरित खेळाडूंच्या चाचण्या निगेटीव्ह आल्याची माहिती संघ व्यवस्थापनानं दिली आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबईमुंबई इंडियन्सबीसीसीआय