IPL 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयपीएलमधील सर्व फ्रँचायजींना एक पत्र पाठवलं आहे. यात बीसीसीआयनं काही महत्त्वाच्या सूचना संघ व्यवस्थापनाला केल्या आहेत. येत्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयनं हे पाऊल उचललं आहे. बीसीसीआयनं सर्व फ्रँचायजींना वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे.
हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा
इनसाइड स्पोट्सनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयनं मुंबई इंडियन्ससह सर्वच फ्रँचायजींना एक पत्र पाठवलं आहे. यात टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंबाबत कोणत्याही पद्धतीचा धोका पत्करला जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवड झालेले खेळाडू संपूर्ण लीग संपेपर्यंत फीट राहतील याची काळजी घेण्याचं आवाहन बीसीसीआयनं सर्व संघ व्यवस्थापनांना केलं आहे. त्यामुळे खेळाडूंवर जास्त दबाव येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे.
गांगुलीमुळेच KKR साठी खेळायचं होतं अन् डावखुराही त्याच्यामुळेच झालो: व्यंकटेश अय्यर
रोहित शर्मा वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्याबाबतीत आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. पहिल्या सामन्यात रोहितला विश्रांती देऊन मुंबई इंडियन्सनं चांगला निर्णय घेतला. आम्ही रोहित आणि मुंबई इंडियन्सला दोघांनाही वर्ल्डकप स्पर्धेला प्राथमिकता दिली जावी आणि आवश्यक विश्रांती घ्यावी असं सांगितलं असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे.